Affordable Electric Cars: कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 456 किमीपर्यंत रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:13 PM2023-03-06T18:13:01+5:302023-03-06T18:26:07+5:30

Affordable Electric Cars: जाणून घ्या देशातील सर्वात कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारचे डिटेल्स, जे आकर्षक डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि लाँग रेंजसाठी पर्याय...

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत हळूहळू इलेक्ट्रिक कार (Electric Cars) खूप लोकप्रिय होत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक कारच्या सध्या रेंजमध्ये ग्राहकांना हॅचबॅकपासून सेडान आणि एसयूव्हीपर्यंत कार निवडण्याचा पर्याय देते. जर तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर येथे जाणून घ्या देशातील सर्वात कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारचे डिटेल्स, जे आकर्षक डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि लाँग रेंजसाठी पर्याय असू शकतात.

Tata Tiago EV ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कारमध्ये दोन भिन्न बॅटरी पॅक पर्याय मिळतात. एक 19.2 kWh युनिट आणि दुसरा 24 kWh व्हेरिएंट. जे अनुक्रमे 60 Bhp आणि 74 Bhp पॉवर जनरेट करतात. बॅटरी पॅकवर अवलंबून एका चार्जवर 250 ते 310 किमी ड्रायव्हिंग रेंजचा दावा टाटा मोटर्स कंपनीकडून केला जातो.

Citroen ने अलीकडेच eC3 भारतात लाँच केली. C3 हॅचबॅकवर आधारित इलेक्ट्रिक कार. कारमध्ये 29.2 kWh LFP बॅटरी पॅक मिळतो आणि सिंगल चार्जवर 320 किमीची रेंज देण्याचा दावा केला जातो. या इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल फ्रंट एक्सल-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 56 bhp आणि 143 Nm टॉर्क विकसित करते. Citroen eC3 इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 107 kmph आहे.

Tata Tigor EV ही एकमेव इलेक्ट्रिक सेडान आहे, जी सध्या 20 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. यात 26 kWh लिक्विड-कूल्ड IP67-रेटेड लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे. ही पॉवरट्रेन 74 bhp आणि 170 Nm पीक टॉर्क निर्माण करते. सेडान सिंगल चार्जवर 315 किमीचा दावा करते. या सेडानची ड्रायव्हिंग रेंज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

Tata Nexon EV ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV आहे. या कारने भारतातील टाटा मोटर्सच्या ईव्ही प्रवासात क्रांती घडवून आणली आणि सध्या ती प्राइम आणि मॅक्स व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Nexon EV Prime ला 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी मिळते तर Nexon EV Max ला 40.5 kWh युनिट मिळते. टाटा मोटर्सचा दावा आहे की, ही SUV पहिल्या बॅटरी पॅकवर 312 किमी आणि दुसऱ्या बॅटरी पॅकवर 437 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या टॉप 5 यादीतील शेवटचे नाव महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 आहे. या SUV ला 39.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. कंपनीचा दावा आहे की SUV एका चार्जवर 456 किमीची रेंज देते. कारचे बेस-स्पेक EC व्हेरिएंट 34.5 kWh बॅटरी पॅकला सपोर्ट करते आणि सिंगल चार्जवर 375 किमीची रेंज देते.