सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:06 PM 2021-09-15T17:06:52+5:30 2021-09-15T17:22:05+5:30
सरकारही इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक कारची विक्रीही हळूहळू वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत आणि इतर कंपन्याही लवकरच लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. (Top 5 best selling electric car in india) आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून मुक्तता हवी असेल, तर आपण इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. सरकारही इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक कारची विक्रीही हळूहळू वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत आणि इतर कंपन्याही लवकरच लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. आज आम्ही आपल्याला भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारसंदर्भात आणि त्यांपैकी कोणती कार चांगली? यासंदर्भात माहिती देणार आहोत.
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक (TATA NEXON EV) - भारतीय बाजारात सध्या टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारची सर्वाधिक डिमांड आहे. ऑगस्ट -2021 मध्ये नेक्सॉन EV चे एकूण 1022 युनिट्स विकले गेले. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम आकडा आहे. गेल्या वर्षी, टाटा नेक्सॉन EV चे एकूण 2,529 युनिट्स विकले गेले होते. टाटा मोटर्सच्या सर्वात सुरक्षित SUV, Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख ते 16.25 लाख रुपयांदरम्यान आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Tata Nexon Ev ला सर्वात सुरक्षित कारचा दर्जा मिळाला आहे. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, टाटा नेक्सॉन 312 किमीपर्यंत धावू शकते. याच बरोबर, या कारवर 8 वर्षांची स्टँडर्ड वारंटी आणि IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकदेखील समाविष्ट करण्यात आला आहे. चार्जिंगसंदर्भात बोलायचे झाल्यास, Nexon बॅटरी केवळ 60 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होऊ शकते.
TATA TIGOR - टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष लक्ष आहे. गेल्या महिन्यातच, TATA ने नवीन इलेक्ट्रिक Tigor EV लाँच केली. याच बरोबर, कंपनीने दावा केला आहे, की नवीन टिगोर एकादा चार्ज केल्यानंतर 250 किमीपरंयत धावू शकते. नवीन Tigor EV ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हिची बॅटरीही एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटीही आहे.
MG ZS EV - आपण MG मोटरची MG ZS EV ही इलेक्ट्रिक कारही खरेदी करू शकता. या कारला भारतातही चांगली मागणी आहे. एमजी मोटर ने जानेवारी 2020 मध्ये MG ZS EV लाँच केली होती. ऑगस्टमध्ये MG ZS EV साठी एकूण 700 बुकिंग झाले होते. गेल्या वर्षी एकूण 1,142 युनिट्सची विक्री झाली होती. या कारची किंमत 20.88 लाख ते 23.58 लाख रुपयांदरम्यान आहे.
सिंगल चार्जमध्ये 340 किमीपर्यंतची रेंज - ही कार Excite आणि Exclusive अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 340 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच, ही कार 7.4kW चार्जरच्या मदतीने 6 ते 8 तासांत 0 ते 100 टक्के चार्ज केले जाऊ शकते. याशिवा, 50kW DC फास्ट चार्जरने चार्ज होण्यासाठी हिला 50 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
HYUNDAI KONA - आपण थोडी आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आपल्यासाठी ह्युंदाई कोना हा एक चांगला पर्याय आहे. 2020 मध्ये, या कारचा मार्केट शेअर 5.6% एवढा होता. दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये ह्युंदाई कोनाची किंमत 23.75 लाख ते 23.94 लाखपर्यंत आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये लाँच करण्यात आली.
Kona मध्ये 39.3 kWh ची बॅटरी आहे, ही बॅचरी 136 hp ची पॉवर देते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 452 किमीपर्यंत धावू शकते. या कारमधील लिथियम पॉलिमर बॅटरी एसी चार्जरवर 6 तासांत पूर्ण चार्ज होते. कोना 0 ते 100 किमी प्रतितासाचा वेग वाढवण्यासाठी 9.7 सेकंद घेते. या कारची टॉप स्पीड 165 किमी प्रतितास आहे.
Mahindra e-Verito - आपण महिंद्रा अँड महिंद्राची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर महिंद्रा ई-व्हेरिटो कार खरेदी करू शकता. भारतीय बाजारात या कारची किंमत 9.13 लाख ते 11.6 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर ती 181 किमीपर्यंतची रेंज देते. महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 21.2 kWh लिथियम ऑयन बॅटरी आहे.