देशातील सर्वात सुरक्षित 5 कारची लिस्ट, सर्वांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 11:31 IST2023-09-04T11:11:50+5:302023-09-04T11:31:33+5:30
सध्या अनेक कार मार्केटमध्ये विविध फीचर्ससह सज्ज झाल्या आहेत.

Volkswagen Virtus
जर्मन ऑटो कंपनी फोक्सवॅगनची ही कार सुरक्षिततेच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या फोक्सवॅगन व्हरटस आणि स्कोडा स्लाव्हिया या भारतातील पहिल्या सेडान बनल्या आहेत. या कारना वयस्क आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. व्हरटसने अॅडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये 34 पैकी 29.71 आणि चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये 49 पैकी 42 गुण मिळवले.
Volkswagen Taigun
भारतातील सर्वात सुरक्षित SUV देखील जर्मन कार निर्माता फोक्सवॅगन आणि कंपनीची चेक पार्टनर स्कोडा यांनी ऑफर केल्या आहेत. Taigun कॉम्पॅक्ट SUV ने गेल्या वर्षी ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार मिळवले होते. वयस्क आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी Taigun ला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, 71.64 गुणांच्या एकूण सुरक्षा स्कोअरसह, Taigun ही भारतात विकली जाणारी सर्वात सुरक्षित SUV कार आहे.
Mahindra Scorpio N
महिंद्रा स्कॉर्फिओ एनला (Mahindra Scorpio N)सुरक्षेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. महिंद्राने Scorpio N गेल्या वर्षी लाँच केली आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Scorpios ची एक्स-शोरूम किंमत 12 लाख 73 हजार रुपयांपासून ते 24 लाख 3 हजार रुपयांपर्यंत आहे.
Tata Punch
टाटा मोटर्सने (Tata Moters) अलीकडेच भारतात सर्वात लहान एसयूव्ही पंच सादर केला आहे. पण लाँच होण्यापूर्वीच ही देशातील सर्वात सुरक्षित SUV बनली आणि Tata Punch ला ग्लोबल NCAP कडून सुरक्षिततेसाठी पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळाले. अॅडल्ट ऑक्युमेंट प्रोटेक्शनसाठी कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग (16.453) आणि चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 4 स्टार रेटिंग (40.891) प्राप्त झाले. जानेवारी 2020 मध्ये Altroz आणि डिसेंबर 2018 मध्ये Nexon आणि 2021 Tigor EV नंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळवणारे टाटा हे तिसरे वाहन आहे.
Tata Altroz
टाटा मोटर्सकडून येणारी प्रीमियम हॅचबॅक कार Altroz चे नाव देखील या यादीत आले आहे. याला त्याच्या क्रॅश टेस्टदरम्यान ग्लोबल NCAP द्वारे अॅडल्ट ऑक्युमेंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार रेटिंग आणि चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 3 स्टार रेटिंग प्राप्त झाले. सेफ्टी एजन्सीच्या अहवालात असे नमूद केले आहे की अल्ट्रोझ एक स्थिर संरचना आणि फूटवेल क्षेत्र, डोके आणि मान संरक्षण, समोरच्या सीटवर दोन रहिवासी अशी उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स देते.