Toyota ची नवी SUV पाहिलीत का? जबरदस्त लूक, फिचर्स अन् दमदार पावर By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:20 PM 2022-01-27T15:20:39+5:30 2022-01-27T15:26:45+5:30
Toyota New 2023 Sequoia: टोयोटा कंपनीनं एक ऑल न्यू 2023 Sequoia एसयूव्ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. टोयोटा कंपनीनं नुकतीच एक जबरदस्त एसयूव्ही कार जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कार फूल साइज एसयूव्ही कार असून यात ३.५ लीटर आयफोनर्स मॅक्स ट्विन टर्बोचार्ज्ड ६ हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे.
टोयोटा कंपनीनं या नव्या कारसाठी २०२२ टोयोटा टुंडाराच्याच प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.
टोयोटाच्या या नव्या एसयूव्ही कारचं नाव Toyota Sequoia असं असून कारचं वजन ४,०८२ किलोग्रॅम आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत ही एसयूव्ही २२ टक्क्यांनी अपग्रेड करण्यात आली आहे.
नव्या मॉडलमध्ये दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याजत एक टीआरडी स्पोर्ट्स आणि टीआरडी ऑफ रोड असे पर्याय देण्यात आले आहेत.
टोयोटा आय-फोर्स मॅक्स हायब्रिड पावरट्रेनचा वापर यात करण्यात आला आहे आणि ट्विन टर्बो व्ही-६ इंजिन देण्यात आलं आहे.
कारमध्ये ४३७ एचपीची पावर आणि ७९० एनएनचा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कारचं इंजिन १० स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
टोयोटाच्या नव्या 2023 Toyota Sequoia ची विक्री येत्या उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता असून सध्या ही कार जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे.