TVS Motor Company Raider 125: जबरदस्त लूक आणि तगडे मायलेज; TVS ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:17 PM 2022-01-28T16:17:57+5:30 2022-01-28T16:23:42+5:30
TVS Motor Company Raider 125: TVSच्या या बाईकची एक्स-शोरुम किंमत 77,500 रुपयांपासून सुरू होते. खास तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच कंपनीने ही प्रीमियम लुक बाईक तयार केली आहे. भारतातील दिग्गज मोटारसायकल कंपनी TVS ने गेल्या काही वर्षात बाजारपेठेवर मजबूत पकड निर्माण केली आहे. गेल्या सप्टेंबरमध्येच कंपनीने एक अशी बाइक बाजारात आणली आहे, जी लुकपासून मायलेजपर्यंत आणि पॉवरपासून किंमतीपर्यंत सर्वच बाबतीत पैसा वसूल बाईक आहे.
आज आम्ही तुम्हाला TVSच्या Raider 125 बद्दल सांगणार आहोत, जी एक सामान्य रायडिंग मोटरसायकल आहे. परंतु लुकच्या बाबतीत एखाद्या प्रीमियम स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी नाही.
TVSच्या या बाईकची एक्स-शोरुम किंमत 77,500 रुपयांपासून सुरू होते. तरुण ग्राहकांसाठीच कंपनीने ही प्रीमियम लुक बाईक तयार केली आहे.
TVS Raider 125 मध्ये DRL सह नवीन एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत, जे दिसायला खूपच आकर्षक आहेत. पॉवरफुल फ्युएल टँक आणि त्यावरील श्राउड्स बाईकचा लुक आणखी वाढवतात.
कंपीने बाईकला इंजिन गार्डदेखील दिले आहे. आरामदायी प्रवासासाठी, दोन भागात विभागलेले सीट आणि सिंगल-पीस ग्रॅब रेल्स मागच्या व्यक्तीसाठी दिले आहेत.
बाईकच्या मागील बाजूस LED टेललाइट देण्यात आला आहे आणि बाईक 17-इंच अलॉयजवर चालते. रेडर 125 पिवळा, लाल आणि काळा अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बाइकला पूर्णपणे डिजिटल कन्सोल मिळतो, जो रायडरला तीन ट्रिप मीटर, एक्झॉस्ट पेट्रोल, इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर, गियर-शिफ्ट इंडिकेटर आणि वेग दाखवतो.
बाईकमध्ये 124.8 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 11.2 Bhp पॉवर आणि 11.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 67 किमी मायलेज देते.
TVS ने बाइकला इको आणि पॉवर असे दोन राइडिंग मोड दिले आहेत. पॉवर मोडमध्ये इंजिन पॉवर 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुढच्या भागात टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे, तर ब्रेकिंगसाठी समोरच्या बाजूला ड्रम आणि मागच्या बाजूला डिस्कचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये या बाईकची होंडा सीबी शाइन, शाइन एसपी 125, हिरो ग्लॅमर, बजाज पल्सर 125 आणि एनएस 125 यांसारख्या बाइक्सशी स्पर्धा करत आहे.