TVS नं लाँच केली जबरदस्त बाईक, TFT स्क्रीनवरही मिळणार भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:28 PM2022-10-20T13:28:47+5:302022-10-20T13:33:36+5:30

बाईकमध्ये देण्यात आले आहेत भन्नाट फीचर्स....

TVS नं आपला मेटावर्स प्लॅटफॉर्म मोटोवर्स रिलिज केला आहे. हे युझर्सना गेमिंग ग्राफिक फील देतं. मोटोवर्समध्ये कंपनीनं आपली TVS रेडर 125 लाँच केली. यामध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीसोबत 5 इंचाचा टीएफटी एन्स्ट्रूमेंट क्लस्टर दिला आहे.

याला तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करून गुगल व्हॉईस असिस्टंसप्रमाणे कंट्रोल करू शकता. या बाईकची एक्स शोरुम प्राईज 99,999 रुपये इतकी आहे. तसंच ही बाईक 5.9 सेकंदात 0 ते 60 चा स्पीड पकडते.

या बाइकमध्ये कंपनीने 124.8cc सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे, जे 11.2 bhp पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात 10 लिटरचा फ्युअल टँक देण्यात आला आहे. यात 17-इंच अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फोर्क्स, मोनोशॉक, ब्रास टाईप फ्रंट डिस्क आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्स मिळतात. या बाईकचे वजन 123 किलो आहे.

या बाईकमध्ये TFT कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. कंपनीने अलीकडेच NTorq स्कूटरमध्ये असेच कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत. ब्लूटूथ कनेक्टेड हेल्मेटच्या मदतीने तुम्ही व्हॉइस कमांड देऊ शकाल.

तुम्ही म्युझिक प्लेइंग ऑप्शन, मॅप नेव्हिगेशन, नोटिफिकेशन कंट्रोल यासह पावसाचा अंदाज देखील जाणून घेऊ शकाल. इंधन संपल्यावर, बाईक तुम्हाला जवळच्या पेट्रोल पंप स्टेशनवर नेण्यासाठी नेव्हिगेट करेल. डू-नॉट डिस्टर्ब मोड चालू केल्यावर कॉल सिस्टम बंद होईल.

TVS Raider 125 च्या इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर, ग्राहकांना त्यात फायरी यलो आणि विकेड ब्लॅक कलरसह गेमिंगचा अनुभव मिळेल. या 'टेक गॅझेट'च्या हँडलमध्ये गेमिंग कन्सोलप्रमाणे दोन्ही बाजूला HMI अॅक्शन बटन्स देण्यात आली आहेत.

तुम्ही डाव्या हाताच्या बटणाने व्हॉइस कमांड देऊ शकाल. त्याच वेळी, मेन्यू उजव्या हाताच्या बटणाने उघडेल. बटणाच्या मदतीने, ग्राहकांना कॉल स्वीकारण्यास किंवा नाकारण्याचा पर्याय मिळेल. व्हॉईस कमांड सपोर्टसह तुम्ही करंट लोकेशन, जवळपासची रेस्टॉरंट आणि पेट्रोल पंप यांसारखी ठिकाणे शोधण्यात सक्षम असाल.