TVS scooter will hit Bajaj's Chetak; Launch iQube, china's Aura
बजाजच्या चेतकला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसची स्कूटर आली; iQube, Aura लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 02:43 PM2020-01-26T14:43:58+5:302020-01-26T14:48:37+5:30Join usJoin usNext काही दिवसांपूर्वीच बजाजची चेतक ही आठवणीतली स्कूटर नव्या रुपात आली होती. ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 95 किमी धावणार आहे. तर आज आणखी एका भारतीय कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. TVS Motor Company ने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर TVS iQube लाँच केली आहे. टीव्हीएस दर महिन्याला 1 हजार स्कूटर तयार करणार आहे. ग्राहक या स्कूटरची बुकिंग काही मोजक्याच डीलरशीपकडे 5000 रुपयांत करू शकतात. या स्कूटरची विक्री आधी बेंगळुरूमध्येच केली जाणार आहे. यानंतर अन्य शहरांमध्ये विकली जाईल. स्कूटरच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये टीव्हीएस मोटरचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले की, TVS Motor सर्व संशोदन ग्राहकांना समोर ठेवून करते. कंपनीचे लक्ष 'ग्रीन आणि कनेक्टेड' तरुणाईवर आहे. टीव्हीएसची आयक्यूब ही इलेक्ट्रिक अॅडव्हान्स ड्राइव्हट्रेन आणि Next Generation TVS स्मार्ट एक्सकनेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. TVS iQube वर कंपनी 2018 पासून काम करत होती. या स्कूटरचे प्रोटोटाईप कंपनीने 2018 च्या ऑटोएक्स्पोमध्ये लाँच केला होता. TVS iQube मध्ये 4.4 kW ची मोटर आहे. जास्तित जास्त वेग 78km/h आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 75 किमी अंतर कापते. इकॉनॉमी आणि पावर मोड देण्यात आले आहेत. एकदा चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. याशिवाय चीनच्या Benling India या कंपनीने भारतात नवीन electric scooter Aura लाँच केली आहे. ऑराला 120KM ची रेंज आहे. सर्वाधिक वेग 60 किमी आहे. टीव्हीएस या स्कूटरची ऑनरोड किंमत 1.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर Aura ची किंमत 99 हजार रुपये आहे. चार्जरटॅग्स :वीजेवर चालणारं वाहनबजाज ऑटोमोबाइलस्कूटर, मोपेडचीनelectric vehiclebajaj automobilescooterchina