Hyundai Venue N Line: 'ह्युंदाई वेन्यू'चे दोन व्हेरिअंट; नवे अलॉय व्हील्स अन् एअर प्युरिफायर; आणखी काय-काय मिळणार? पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:07 AM 2022-06-29T11:07:58+5:30 2022-06-29T11:17:23+5:30
Hyundai Venue N Line: दक्षिण कोरियाची बहुचर्चित कंपनी ह्युंदाईकडून नुकतंच ह्युंदाई वेन्यूचं फेसलिफ्ट लॉन्च केलं. याचं N Line व्हेरिअंट देखील येत्या काही महिन्यात लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ह्युंदाईनं वेन्यूचं फेसलिफ्ट व्हर्जन नुकतंच लॉन्च झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वेन्यूच्या N Line व्हेरिअंट ची चाचणी देखील केली जात आहे. मार्च महिन्यात याची चाचणी केली जात असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. वेन्यू एन लाइनचे दोन व्हेरिअंट सिंगल इंजिनसह बाजारात दाखल केले जाणार आहेत.
वेन्यूचे दोन व्हेरिअंट येणार ह्युंदाई i20 N Line सारखेच Venue N Line व्हेरिअंट कंपनी बाजारात दाखल करू शकते. यात N6 आणि N8 असे दोन व्हेरिअंट येतील. दोन्ही व्हेरिअंटमध्ये 120hp, 1.0L, थ्री सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकतं. हेच इंजिन वेन्यूच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये वापरलं जातं. पण यात i20 N Line च्या iMT गियरबॉक्स ट्रान्समिशन ऐवजी DCT ऑटोमॅटीक ट्रान्समिशन दिलं जाऊ शकतं.
फिचर्स काय असतील? नव्या व्हेरिअंटमध्ये वेन्यूच्या टॉप व्हेरिअंटप्रमाणेच वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह अपडेटेड ८ इंचाची टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, एम्बिअंट लायटिंग, पावर्ड ड्रायव्हर सीट, LED प्रोजेक्टर आणि DRLs सह कॉर्नरिंग हेडलॅम्प, इंटीग्रेटेड एअर प्युरिफायर, व्हाइस कमांड आणि बोस ऑडियो सिस्टमसारखे फिचर्स मिळणार आहेत.
एक्स्टिरियरमध्ये काय बदणार? वेन्यूच्या नव्या व्हेरिअंटमध्ये डिझाइनच्या बाबतीत बरेच बदल केले आहेत. यात युझर्सना कारच्या फ्रंट लूकमध्ये N Line ची बॅजिंग मिळू शकते. याशिवाय लोअर सेक्शनमध्ये रेड असेंटसह पुढे आणि मागे नवा बंपर पाहायला मिळू शकतो.
नव्या व्हेरिअंटमध्ये रुफ रेलवर रेड इंजर्ट, नवे अलॉय व्हील्स डिझाइन आणि ड्युअल टिप एक्जॉस्ट देखील मिळणार आहे.
नव्या व्हेरिअंटच्या इंटेरिअरमध्ये सध्याच्या मॉडलसारखाच लूक पाहायला मिळू शकेल. पण यात ऑल-ब्लॅक इंटेरियर थीमचा वापर केला जाऊ शकतो.
दुसऱ्या N Line मॉडलमध्ये केबिनच्या जवळ डॉटेड 'N' लोगो पाहायला मिळू शकतो. दरम्यान एन्ट्री लेव्हल N6 मध्ये व्हाइस कमांड, एम्बिअंट लायटिंग आणि एअर प्युरिफायर इत्यादी फिचर्स दिले जाण्याची शक्यता फार कमी आहे.