व्होल्वोचा अजब ट्रक; विनाचालक कार ओढणार 32 टनांचे वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 13:16 IST2018-09-14T13:13:00+5:302018-09-14T13:16:14+5:30

व्होल्वोनुसार हा इलेक्ट्रीक ट्रक ड्रायव्हर केबिनशिवाय तयार केला आहे. या ट्रकचे नाव व्होल्वो व्हेरा ठेवण्यात आले आहे.

या ट्रकवर जास्तीतजास्त 32 टनांचे वजन लादू शकतो. हा ट्रक सध्या विकसित करण्यात येत आहे.

सुरुवातीला हा ट्रक मोठमोठे पोर्ट, लॉजिस्टिक सेंटर्सना पुरविला जाणार आहे.

व्हेरा हा ट्रक कोणत्याही स्टँडर्ड कंटेनरला जोडला जाऊ शकणार आहे. कंपनीने या ट्रकची बाहेर विक्री करण्याबाबत अद्याप सांगितलेले नाही.