Volvo XC40 Recharge: सिंगल चार्जमध्ये 418 किमीची रेंज, 26 जुलै रोजी लॉन्च होणार Volvoची पहिली इलेक्ट्रिक कार By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:57 PM 2022-07-05T18:57:23+5:30 2022-07-05T21:13:46+5:30
गेल्या वर्षीच या कारची लॉन्चिंग होणार होती, पण कोव्हिड-19 महामारी आणि सेमिकंडक्टर चिप संकटामुळे यात उशीर झाला. आता येत्या 26 जुलै रोजी ही कार भारतात लॉन्च होणार आहे. सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या नवनवीन गाट्या लॉन्च करत आहेत. यातच व्होल्व्हो कार्स(Volvo Cars) येत्या 26 जुलै रोजी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार XC40 Recharge (XC40 रिचार्ज) एसयूव्ही लॉन्च करणार आहे.
गेल्या वर्षीच या कारची लॉन्चिंग होणार होती, पण कोव्हीड-19 महामारी आणि सेमिकंडक्टर चिप संकटामुळे यात उशीर झाला. व्होल्व्होने या वर्षीच्या सुरुवातीला भारतात उपलब्ध असलेल्या आपल्या XC40 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन येणार असल्याचे संकेत दिले होते. XC40 रिचार्जला भारतात असेंबल केले जात आहे.
Volvo XC40 Recharge ची असेंबली भारतात झाल्यामुळे यावर लागणारा खर्चा काहीप्रमाणात कमी होईल. आता आशा आहे की, या महिन्याच्या अखेरीस व्होल्व्होकडून या गाडीची बुकींग सुरू केली जाईल. तसेच, दिवाळीपर्यंत या गाडीची डिलीव्हरी होण्याची शक्यता आहे. ही गाडी किआच्या EV6 सारख्या इलेक्ट्रीक गाड्यांना टक्कर देईल.
Volvo XC40 Recharge ऑल-व्हील ड्राइव्ह सेट-अपसह येते. यात दोन 204hp इलेक्ट्रिक मोटर्स लावण्यात आल्या आहेत. या 408hp ची पॉवर आणि 660Nm टार्क जनरेट करतात. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रती तास वेगाने धावते. तसेच, याची टॉप स्पीड 180 किमी प्रती तास आहे.
यात 78kWh ची अंडर-फ्लोअर बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याच्या मदतीने इलेक्ट्रिक XC40 यूरोपीय WLTP टेस्ट सायकलनुसार, एक फुल चार्जमध्ये 418 किमीची रेंज देते. बॅटरीला 11kW AC किंवा 150kW DC ने चार्ज करता येते. डीसी चार्जर फक्त 40 मिनीटात 0 ते 80 टक्के चार्ज करतो.
Volvo XC40 Recharge आपल्या कॉम्पॅक्ट मॉड्यूलर आर्किटेक्चर (CMA) वर आधारित आहे. याचा वापर कंपनीच्या सामान्य एसयूव्हीमध्येही करण्यात आला आहे. यात काही नवीन बदलांसह सर्व जुनी डिझाइन ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रीक एसयूव्हीमध्ये ब्लँक्ड-ऑफ ग्रिल देण्यात आले आहेत.
यात इंडिया-स्पेक XC40 मध्ये एलईडी हेडलाइट्स, 19-इंच अलॉय व्हील्स, पॅनोरमिक सनरुफ, लेदर अपहोल्स्ट्री, टेलगेटसाठी हँड्स-फ्री फंक्शन, टू-झोन क्लायमेट कंट्रोल, 12-इंच डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग, अँड्रॉइड-पावर्ड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, मेमरीसोबत पॉवर्ड ड्रायवर सीट आणि एक पॉवर्ड पॅसेंजर सीटसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.