स्वस्तात मस्त ‘स्पोर्टी’ कार घ्यायचीय? हे आहेत पाच पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 12:04 PM2022-12-18T12:04:52+5:302022-12-18T12:08:54+5:30

तुम्हाला कमी किमतीत पण स्पोर्टी लूक असलेली कार खरेदी करायची असेल तर हे आहेत सर्वांत स्वस्त पर्याय...

तुम्हाला कमी किमतीत पण स्पोर्टी लूक असलेली कार खरेदी करायची असेल तर हे आहेत सर्वांत स्वस्त पर्याय...

ह्युंदाई ग्रँड आय १० निऑस टर्बो ही स्पोर्टी हॅचबॅक कार कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत - ८.०२ लाखांपासून सुरू होते.

महिंद्राने गेल्या महिन्यातच आपली लोकप्रिय एक्सयूव्ही ३०० ही सब ४ मीटर एसयूव्ही स्पोर्टी आवृत्तीमध्ये आणली आहे. ही एसयूव्ही १० सेकंदात शून्य ते १०० किमीचा वेग पकडते, असा कंपनीचा दावा आहे. एक्स-शोरूम किंमत १०.३५ लाख रुपयांपासून.

बजेटमध्ये स्पोर्टी कार खरेदी करणाऱ्यांसाठी टाटा मोटर्सची अल्ट्रोझ आयटर्बो हीदेखील उत्तम पर्याय आहे. आयटर्बो आवृत्तीची किंमत ८.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

आय २० एन लाइनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर ह्युंदाईने अलीकडेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूदेखील एन लाइन आवृत्तीमध्ये आणली आहे. ही जास्त स्पोर्टी लूक आणि लेटेस्ट फीचर्ससह आली असून, एक्स-शोरूम किंमत १२.१६ लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई कंपनीने या प्रीमियम हॅचबॅक कारची स्पोर्टियर एन लाइन आवृत्तीही आकर्षक एक्सटिरियर्स आणि इंटिरियर्स व शानदार फीचर्ससह आणली आहे. आय २० एन लाइनची एक्स-शोरूम किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होते.

टॅग्स :कारcar