Want to buy a 'safe' car?; See 10 important safety features...!
तुम्हाला 'सेफ' कार घ्यायचीय?; बघा १० महत्वाचे सेफ्टी फीचर्स...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 04:30 PM2022-07-24T16:30:41+5:302022-07-24T16:55:10+5:30Join usJoin usNext तुम्हीही नवीन कार घेणार असाल, तर काही महत्वाचे सेफ्टी फीर्चस असणे आवश्यक आहे. साधारणपणे महागड्या कारमध्ये जवळपास सर्व सुरक्षा फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी सरकारने अनेक नवे नियम आणले असले, तरी एंट्री लेव्हल कारमध्ये अजूनही अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांशी तडजोड केली जाते. तुम्हीही नवीन कार घेणार असाल, तर काही महत्वाचे सेफ्टी फीर्चस असणे आवश्यक आहे.ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज अपघातसमयी एअरबॅग्ज सर्वात महत्वाच्या ठरतात. किमान पुढील प्रवासी आणि चालकासाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग असणे आवश्यक आहे. सीट बेल्ट प्री-टेन्शर यामुळे अचानक ब्रेक लागताना किंवा अपघातात प्रवाशांची सीटवर पोझीशन कायम राहते. एबीएस-ईबीडी अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रोनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन हे महत्वाचे ब्रेकिंग वैशिष्ट्ये अचानक ब्रेक लावताना दोन्ही महत्वाची भूमिका बजावतात. रिव्हर्स पार्किंग सेन्सर व कॅमेरा कमी जागेत पार्किंग करताना दोन्ही खूप उपयोगी, कारमागे एखादी व्यक्ती किंवा अडथळा असल्यास सेन्सर ड्रायव्हरला अलार्मद्वारे अलर्ट करतो.टीपीएमएस अचानक टायर पंक्चर होतो किंवा फुटतो अशावेळी अपघात टाळण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम उपयोगी, हे फीचर काही बजेट कारमध्येही आता उपलब्ध. कॉनीरिंग स्टेबिलिटी कंट्रोल भरधाव कार वळवताना योग्य नियंत्रण राखते, ही यंत्रणा चाकांचा वेग समजते आणि ब्रेक फोर्स वितरित करते. स्पीड रिमाइंडर हे फीचरही उपयुक्त ठरते, वेग जास्त असल्यास अलार्म वाजतो.रिइनफोर्स्ड बी-पिलर समोरासमोरच्या धडकेत कारचे सर्वाधिक नुकसान होते, अनेक गाड्यांचे ए आणि बी पिलर आता रिइनफोर्स्ड स्टीलचे असतात, त्यामुळे कारच्या संरचनेला समोरुन अधिक ताकद मिळते आणि क्रॅश सहन करण्याची क्षमताही वाढते. आयसोफिक्स चाइल्ड अँकर लहान मुलांसाठी कारमध्ये हे एक महत्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य. तथापि, भारतातील एंट्री-लेव्हल कारमध्ये हे फीचर मिळत नाही. टॅग्स :वाहन उद्योगअपघातभारतरस्ते सुरक्षाAutomobile IndustryAccidentIndiaroad safety