What if the penalty for breaking the traffic rules is not paid? Don't be misled ...
वाहतूक नियम मोडल्याचा दंड भरला नाही तर काय होईल? भ्रमात राहू नका... By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:46 PM2019-09-18T15:46:18+5:302019-09-18T15:52:22+5:30Join usJoin usNext वाहतुकीचे नवीन नियम नव्या दंडांसह लागू झाले आहेत. आता ई चलन दिले जात आहे. कॅमेरे लावलेले असतील तर पोस्टाने आणि एसएमएसद्वारे पावती पाठविली जात आहे. अशावेळी गाडीही तुमच्याकडे आणि कागदपत्रेही तुमच्याकडे, मग पावतीतील दंडाची रक्कम कशी आणि कोण वसूल करणार असा प्रश्न पडला असेल. सध्या ही दंडाची रक्कम विमा काढताना वसूल करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ही योजना सध्या केवळ दिल्लीपुरतीच मर्यादित ठेवण्यात येईल. मात्र, इतर देशामध्ये वाहतुकीच्या दंडाची रक्कम न भरणारे असणार. त्यांच्यासाठी काय तरतूद केलेली आहे की दंडाची रक्कम भरली नाही तरीही चालते, असे नाही. पण पोलिसांना ही रक्कम वसूल करण्याचा अधिकार नाहीय. दंडाची पावती आली आणि जर तुम्ही दंड भरला नसाल तर सावध व्हा. तुम्हाला न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे. रस्त्यावर पोलिसांनी फाडलेली पावतीही पोलिसांक़डून न्यायालयात पाठविली जाते. यानंतर वाहनाच्या मालकाला तेथे जाऊन दंड भरावा लागतो. न्यायालयाकडून समन्स पाठविला जातो. तो येवूनही जर वाहन मालक गेला नाही तर न्यायालय अटक वॉरंट जारी करू शकते. ऑन द स्पॉट पावतीवेळी वाहन चालकाचे पेपर जप्त केले जातात, यामुळे ते सोडविणे गरजेचे असते. दुसरे पेपरही बनवता येत नाहीत. मात्र, ऑनलाईनला तसे होत नाही. यामुळे निश्चिंत राहणे धोक्याचे आहे. न्यायालयाने अनेकदा समन्स पाठवूनही जर गेला नाही तर तुमच्या विरोधात अजामिन वॉरंट निघतो. त्यामुळे पोलिसांना अटक करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दंडाची रक्कम आणि आणखी दंड भरावा लागू शकतो. तसेच तुरुंगाची हवाई खावी लागू शकते. जर तुम्ही पावतीची रक्कम भरली नाही तर तुम्ही ते वाहनही विकू शकत नाही. आरटीओकडे बोजा दिसतो. यामुळे पेपर ट्रान्सफर होत नाहीत. एवढेच नाही तर वाहन तारण ठेवून कर्जही घेऊ शकत नाही. जर तुमच्या वाहनाची आरसी जप्त केलेली असेल आणि तुम्ही ती सोडविली नसेल तर दुसऱ्यावेळी तुमचे वाहन जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. यामुळे पावतीची ठराविक मुदत असते. नंतरचा ताप पाहता ही दंडाची रक्कम भरणे सोईचे ठरते. तुमच्याकडे जागेवर कागदपत्रे नसतील तर 100 रुपये भरून कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मिळतो. टॅग्स :वाहतूक पोलीसरस्ते सुरक्षाकारवाहनन्यायालयtraffic policeroad safetycarAutomobileCourt