कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? 'अशी' सुरक्षितरित्या थांबवू शकता आपली गाडी By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:47 PM 2022-11-17T12:47:16+5:30 2022-11-17T12:54:33+5:30
How to stop a vehicle if brakes fail : कारचे ब्रेक फेल झाले तर तुम्ही वेळीच काही गोष्टी केल्या तर तुम्ही ती थांबवू शकता. जाणून घेऊया तुम्हाला अशा परिस्थितीत काय करावं लागेल. How to stop a vehicle if brakes fail : विचार करा, जर तुम्ही 90 कि.मी. ताशी वेगाने कार चालवत असाल आणि अचानक तुमच्या कारचे ब्रेक फेल झाले. अशी परिस्थिती कुणावरही आणि केव्हाही येऊ शकते. खरे तर, कारचे ब्रेक फेल झाल्यानंतर काय करायला हवे, हे फार कमी कार चालकांना माहीत असते.
तर आज आम्ही आपल्याला सागणार आहोत, की चालत्या कारचे ब्रेक फेल झाल्यास आपण कुठल्या स्टेप्स वापरून आपला जीव वाचवू शकता. ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक गडबडतात, घाबरतात. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. यामुळे शांत राहून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
पार्किंग लाइट्स (Hazards) हे आणीबाणीच्या काळासाठीच दिलेले असतात. गाडीचे पार्किंग लाइट्स ऑन झाल्याने, आपल्या कारमध्ये काही समस्या निर्माण झाल्याचे मागून येणाऱ्या लोकांच्या लक्षात येते.
जेव्हा आपल्या गाडीचे ब्रेक फेल होईल तेव्हा गियर बदला. गाडीचे गियर कमी केल्यानंतर, तिचा वेगही कमी होतो. हाच प्रयोग आपल्याला ऑटोमॅटिक कारमध्येही करायचा आहे. अधिकांश ऑटोमॅटिक कार्समध्ये मॅनुअल सेटिंग देण्यात आलेली असते.
या ठिकाणी आपल्याला एक-एक करून गियर कमी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कार पाचव्या गियरवर असेल, तर आपल्याला आधी चौथ्या गियरवर आणायची आहे. कारण गियर थेट पहिल्या किंवा दुसऱ्यावर नेल्यास इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
ब्रेक फेल झाल्यानंतर, कार रस्त्याच्या मधोमध न चालवता, ती लगेच रस्त्याच्या कडेला घ्या. यामुळे अपघात होण्याची धोका कमी होईल.
अशा स्थितीत आपल्याला हँड ब्रेकचा वापर करायला हवा. मात्र, या ब्रेकचा वापर हळूवारपणे करायचा आहे, हे लक्षात असू द्या. वेगात असलेल्या कारला एकदमच हँडब्रेक लावला, तर कार स्किट होऊ शकते आणि आपल्याला दुखापत होऊ शकते.