गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:50 PM2024-10-08T19:50:01+5:302024-10-08T20:00:11+5:30

Electric Scooters : सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहेत.

नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहेत. नुकतेच FADA म्हणजे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या कंपनीनं किती इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे. यासंदर्भात जाणून घ्या....

FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 90007 युनिट्सची विक्री झाली आहे. अहवालानुसार, यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये विक्रीची संख्या 88472 युनिट्स होती. FADA अहवालानुसार, मासिक आधारावर विक्रीत 1.74 टक्के वाढ झाली आहे आणि वार्षिक आधारावर 40.45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

यंदा इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या कंपनीज मार्केटमध्ये जरी येत असल्या तरी ओला इलेक्ट्रिकने विक्रीच्या बाबतीत पहिले स्थान प्राप्त केले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 24679 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 25517 युनिट्सची विक्री झाली आहे. आकडेवारीनुसार, मासिक आधारावर कंपनीची 10.31 टक्के विक्री कमी झाली आहे. परंतु वार्षिक आधारावर सुमारे 32 टक्के वाढ झाली आहे.

बजाज इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चेतक देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 19137 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये ही संख्या 16706 युनिट होती. कंपनीने वार्षिक आधारावर 169 टक्क्यांहून अधिकची वाढ केली आहे.

iQube मालिका या विभागात TVS द्वारे ऑफर केली जाते. विक्रीच्या बाबतीत टीव्हीएसचा टॉप-3 मध्ये समावेश झाला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 18108 युनिट्सची विक्री झाली आहे. तर यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 17543 युनिट्सची विक्री केली होती. मासिक आधारावर कंपनीने तीन टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. तर वार्षिक आधारावर TVS ने 15.96 टक्के वाढ नोंदवली आहे.

बंगळुरू-आधारित स्टार्टअप आणि इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक अथरने गेल्या महिन्यात 12718 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 10830 युनिट होती. वार्षिक आधारावर, Ather ने 76.76 टक्के वाढ मिळवली आहे.

FADA ने जाहीर केलेल्या यादीनुसार हिरो मोटोकॉर्पचाही टॉप-5 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 4310 युनिट्सची विक्री झाली आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये 4742 युनिट्सची विक्री झाली. आकडेवारीनुसार, Hero च्या मासिक विक्रीत 9.11 टक्क्यांनी घट झाली असून वार्षिक आधारावर कंपनीची विक्री तब्बल 708.63 टक्क्यांनी वाढली आहे.