नितीन गडकरींचं ‘ड्रीम प्रोजेक्ट’; कोट्यवधी भारतीयांना येणार ९० च्या दशकाची आठवण By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 09:38 AM2022-03-13T09:38:43+5:302022-03-13T09:45:08+5:30Join usJoin usNext देशात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रुड ऑईलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम देशात इंधन दरवाढीवर होतो. त्यातच रशिया-यूक्रेन युद्धामुळे क्रुड ऑईलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास त्याचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसतो. कारण इंधन दरवाढीमुळे अन्य महागाई वाढते. अलीकडे पेट्रोलच्या दराने १०० चा आकडा पार केला आहे. तर डिझेलही महागलं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्यायी व्यवस्था आणण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी शनिवारी सांगितले की, सहा महिन्यांत फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करतील असं ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. 'ईटी ग्लोबल बिझनेस समिट'ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते संबोधित करत होते. गडकरी म्हणाले की, सरकार १०० टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल(Ethanol) २० टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते Blended Fuel बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे. वाहने १००% इथेनॉलवर चालतील. गडकरी म्हणाले, "या आठवड्यात, मी सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील असं त्यांनी वचन दिले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मते, लवकरच भारतातील बहुतांश वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालतील. ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं ते म्हणाले. मिश्रणापासून तयार केलेले पर्यायी इंधन - फ्लेक्स-इंधन हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केलेले पर्यायी इंधन आहे. TVS मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी आधीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन(Flex Fuel Ethanol) इंजिन तयार करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर, केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक १०० टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकार स्की योजनेवर काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे, ज्याची किंमत प्रति लिटर ७० रुपयांपेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इनेथॉल मिश्रणास देखील केंद्राने परवानगी दिली आहे. साखर उद्योगाबरोबरच मका, भात, बिट आदीं पासूनही इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज आहे असल्याचं वारंवार नितीन गडकरींनी म्हटलं आहे. सरकारच्या या धोरणामुळे कार किंवा बाईक चालवण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची गरज लवकरच संपणार आहे. काही महिन्यांत अशी बरीच वाहने येतील, जी डिझेल-पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालतील. इथेनॉल हे डिझेल-पेट्रोलपेक्षा सुमारे ४० रुपये प्रतिलिटर स्वस्त पडेल आणि प्रदूषणही कमी होईल. टॅग्स :नितीन गडकरीपेट्रोलडिझेलNitin GadkariPetrolDiesel