World Smallest Car: छोटा पॅकेट बडा धमाका! ‘ही’ आहे सर्वांत लहान कार; देते सर्वाधिक मायलेज, गिनीज बुकमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 01:31 PM2022-04-02T13:31:07+5:302022-04-02T13:35:21+5:30

World Smallest Car: जगातील सर्वांत छोट्या कारची जबरदस्त चर्चा सुरू आहे. पाहा, डिटेल्स...

जगभरात विविध प्रकारच्या, डिझाइनच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. लोकांना नानाविध कारची प्रचंड क्रेझ असते. आपल्या आवडत्या कारसाठी लोकं वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतात.

जगभरात हजारो कार निर्माता कंपन्या असून, त्यांचे करोडो ग्राहक उत्पादनांचा लाभ घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे कारचे मायलेज किती याचाही विचार ग्राहकांकडून प्राधान्याने केला जातो.

जगातील सर्वांत छोटी कार म्हणून ब्रिटनमधील एका कारची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. ही कार म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका असल्याचे बोलले जात आहे. कार छोटी असली तरी मायलेज बाबतीत सर्वच कंपन्यांना मागे टाकते, असे म्हटले जाते.

या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे. ही केवळ १३४ सेंटीमीटर लांब, ९८ सेंटीमीटर रुंद आहे. तर याची हाइट फक्त १०० सेंटीमीटर आहे. या कारच्या मालकाचे नाव ऐलेक्स ऑर्चिन आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, कारची साइज पाहून लोक फारच थट्टा करतात.

ऐलेक्सची उंची जवळपास ६ फूट आहे. त्यामुळे तो या छोट्या कारमध्ये कसा बसतो व कसा उतरतो हे पाहून लोक दंग राहतात. जास्तीत जास्त लोक कारबाबत मस्करी करतात. मात्र, ऐलेक्स आपल्या कारच्या मायलेजने आनंदी आहे.

ही कार ४.५ हॉर्सपॉवरच्या इंजिन सोबत येते. तसेच ती एका लीटर पेट्रोल मध्ये या ४२ किमी पर्यंत धावते. पीएल इंजिनियरिंग नावाची कंपनी या कारला बनवते. आधी या कारला १९६२ ते १९६५ दरम्यान बनवले गेले होते. नंतर याला २०१० पासून प्रोडक्शन बनवणे पुन्हा सुरू केले.

ऐक्सेलच्या म्हणण्यानुसार, ज्या रस्त्यांवरून ही कार जाते. त्यावेळी लोक या कारला आवर्जून पाहतात. २०१० मध्ये या कारला जगातील सर्वांत छोटी कार म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या कारची साइज छोटी जरी असली तरी याची किंमत काही कमी नाही. या कारची किंमत ८४ लाख रुपयांहून जास्त आहे. याचा वेग ३७ किमी प्रती तास आहे.

जगातील सर्वांत छोट्या कारची जबरदस्त चर्चा सुरू आहे. ऐलेक्स या कारने पूर्ण ब्रिटन फिरला असल्याचे सांगितले जात आहे.