जगातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रीक कार धावणार अमेरिकेच्या रस्त्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:31 AM2019-04-25T09:31:48+5:302019-04-25T09:38:09+5:30

Pininfarina Battista (पिनिनफरीना बॅटिस्टा) ही सुपरफास्ट इलेक्ट्रीक कार महिंद्राने नुकतीच Geneva Motor Show मध्ये दाखविली होती. तिचे रुप पाहून कारप्रेमींना भुरळ पडेल. ही कार आता अमेरिकेतील न्युयॉर्कच्या रस्त्यांवर धावणार आहे.

महत्वाचे म्हणजे या कारची किंमत 2.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल 17.43 कोटी रुपये आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रीक कार असून 100 किमीचा वेग ही कार फॉर्म्युला वनच्या कारपेक्षाही अधिक लवकर पकडते.

Automobili Pininfarina ही कंपनी महिंद्राच्या मालकीची आहे. ही कंपनी सुपरफास्ट कारसाठी ओळखली जाते. Pininfarina Battista मध्ये 120kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 290 किमी प्रती तासाच्या वेगापेक्षा धावू शकते. या कारचा सर्वाधिक वेग 215 मैल प्रती तास आहे. म्हणजेच 350 किमी प्रती तास वेगाने ही कार धावू शकते.

कंपनी या कारचा वेग भविष्यात 450 किमी करण्यावर काम करत आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. कंपनीनुसार ही कार केवळ 2 सेंकदांमध्ये 0 ते 100 किमीचा वेग पकडते. तेच 12 सेकंदांत ही कार 300 किमीचा वेग पकडते.

या कारचे उत्पादन 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, सध्या ही कार न्युयॉर्कच्या रस्तांवर धावणार आहे. या कारचे उत्पादन इटलीमध्ये होणार आहे. महिंद्राने 14 डिसेंबर 2015 मध्ये ही कंपनी विकत घेतली होती.

कारमध्ये कार्बन फायबरचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे. यामुळे ही कार वजनाने हलकी आहे. या कारला 21 इंचाचे व्हील्स देण्यात आले आहेत.

जगभरात केवळ 150 कार विकली जाणार आहेत. यापैकी 50 कार अमेरिकेला पाठविण्यात येतील. तर उर्वरित कार युरोप आणि आशियामध्ये विकल्या जाणार आहेत.