या महिलांना मिळालेले जगातील पहिले ड्रायव्हिंग लायसन; ३७ वर्षे वाट पहावी लागलेली... By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:27 PM 2023-10-17T12:27:31+5:30 2023-10-17T12:30:28+5:30
सौदी सारख्या देशांमध्ये अगदी काही वर्षांपर्यंत महिलांना वाहन चालविण्याची परवानगी नव्हती, नाहीय. परंतू, आपल्या भारतात महिला ट्रेन, मेट्रो ते अगदी विमानेही चालवत आहेत. सध्याच्या काळात काही अरब, कट्टर मुस्लिम देश सोडले तर बहुतांश सर्वच देशांत महिला कार-दुचाकी चालवितात. तेथील प्रशासनाकडून यासाठी महिलांना लायसनही दिले जाते. परंतू, महिलांना लायसन देण्यात कुठे सुरुवात झाली, कोणाला पहिले लायसन मिळाले, तुम्हाला माहितीय का...
सौदी सारख्या देशांमध्ये अगदी काही वर्षांपर्यंत महिलांना वाहन चालविण्याची परवानगी नव्हती, नाहीय. परंतू, आपल्या भारतात महिला ट्रेन, मेट्रो ते अगदी विमानेही चालवत आहेत.
महिलांसाठी जगातील पहिले लायसन हे अमेरिकेने जारी केले होते. सॅली रॉबिन्सन यांना सप्टेंबर १९३७ मध्ये दुचाकी चालविण्याचे लायसन मिळाले होते.
यासाठी सॅली यांना अधिकाऱ्यांसोबत कित्येक दिवस झगडावे लागले आहे. सॅली यांना सॅली हॉल्टरमॅन या नावानेही ओळखले जाते. ज्या काळात सॅली यांना लाय़सन मिळाले त्या काळात महिलांसाठी अशक्यप्राय गोष्ट होती.
अमेरिकेच्या वृत्तपत्रानुसार सॅली या उंचीने छोट्या होत्या. त्या केवळ ४ फीट ११ इंच उंच होत्या. तेव्हाच्या बाईक या उंच होत्या. यामुळे त्यांना हे लायसन मिळणे तसे कठीणच होते. तरीही त्या लढत राहिल्या, अधिकाऱ्यांना झुकावेच लागले आणि लायसन मिळविले.
सुरुवातीच्या काळात वॉशिंग्टन डी.सीमध्ये महिला प्रामुख्याने कार चालवायच्या. त्यासाठी त्यांना कार चालविण्याचे लायसन दिले जायचे. साल 1900 मध्ये अॅनी फ्रेंच या जगातील पहिल्या महिला कार चालक बनल्या होत्या.
अॅनीला जगातील पहिले महिलांसाठीचे चार चाकी ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात आले. त्यानंतर तब्बल 37 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सॅली रॉबिन्सनला दुचाकी चालवण्याचा पहिला परवाना मिळाला.