लवकरच बाजारात येणार 'या' भन्नाट इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्सपो 2023 मध्ये या कंपन्यांनी सादर केल्या कार By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:29 AM 2023-01-20T11:29:26+5:30 2023-01-20T11:52:22+5:30
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, अनेक कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त कार सादर केल्या आहेत, टाटा मोटर्सच्या सिएरा ईव्ही आणि हॅरियर ईव्ही एसयूव्ही, तसेच किआ मोटर्सच्या ईव्ही9 एसयूव्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या. Tata Harrier EV ची जबरदस्त क्रेझ Tata Motors ने Auto Expo 2023 मध्ये Harrier EV, त्याच्या शक्तिशाली मिडसाईज SUV Harrier चे इलेक्ट्रिक व्हेरियंटचे अनावरण केले, जे पुढील 2 वर्षांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. Harrier EV लूक आणि फीचर्स तसेच रेंजच्या बाबतीत अप्रतिम असेल.
Tata Sierra EV ची आतुरतेने वाट पाहत आहेत. टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पोमध्ये त्यांची आयकॉनिक सिएरा ईव्ही देखील सादर केली, सिएरा इलेक्ट्रिक लवकरच भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे.
Kia EV9 जोरदार शक्तिशाली Kia Motors ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक SUV Kia 9 च्या संकल्पना मॉडेलचे अनावरण केले.
मारुती सुझुकीने या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये EVX इलेक्ट्रिक SUV संकल्पनेचे अनावरण केले, याची बॅटरी एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त जाते.
BYD कंपनीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये इलेक्ट्रिक सेडान BYD ही कार सादर केली. एका पूर्ण चार्जवर 700 किलोमीटरपर्यंत धावू शकते. BYD सील 4 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.