Yamaha RX100: मस्तच! एक ऱ्हिदम..एक आवाज...तरुणाईच्या काळजाचा ठाव घेणारी Yamaha RX100 रिलॉन्च होणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 02:12 PM 2022-07-19T14:12:47+5:30 2022-07-19T14:18:33+5:30
Yamaha RX100: भारतात नव्वदीच्या दशकात तरुणाईच्या मनामनांत रुतून बसलेली दुचाकी यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) पुन्हा भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. Yamaha RX100: भारतात नव्वदीच्या दशकात तरुणाईच्या मनामनांत रुतून बसलेली दुचाकी यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) पुन्हा भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. यामाहा मोटार इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानानं (Eishin Chihana) यांनी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यामाहा आरएक्स-१०० (Yamaha RX100) रिलॉन्च करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे जसेच्या तसे जुने मॉडल आणणं शक्य नसलं तरी आरएक्स-१०० ची जुनी ओळख कायम राहील आणि आधुनिकतेचाही मुलामा बाइकला असेल याची काळजी घेण्यात येणार आहे.
RX-100 च्या नव्या मॉडलला पावरफुल इंजिन आणि डिझाइनसह येत्या काही वर्षांत लॉन्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.
९० च्या दशकात भारतीय रस्त्यांवर Yamaha RX100 ची अक्षरश: मक्तेदारीच होती असं म्हटलं तरी वावंग ठरणार नाही. स्लिम ट्रीम लूक, सायलंसरचा एकच ऱ्हिदम आणि एकच आवाज...नुसता आवाज कानी पडला की सर्वांची नजर वळायची. आवाजावरुन RX100 ओळखली जायची.
तांत्रिक अडचणी काय? यामाहा आरएक्स-१०० रिलॉन्च करण्याची तयारी कंपनी करत आहे. पण यात तांत्रिक अडचणी येत आहे. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे आरएक्स-१०० टू-स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होती. सध्या टू-स्ट्रोकसह बीएस-६ इंजिनला अनुकूल असं इंजिन तयार केलं जाऊ शकत नाही.
आरएक्स-१०० चं नवं मॉडेल वेगळ्या इंजिनसह आणि आधुनिक पद्धतीनं सादर केलं जाईल. पण त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. कारण यामाहा जवळ २०२५ पर्यंतचे लॉन्चिंग लाइनअप आहेत. त्यामुळे आरएक्स-१०० त्याआधी लॉन्च करणं खूप कठीण असल्याचं कंपनीचे चेअरमन चिहाना यांनी सांगितलं.
आरएक्स-१०० सारखं इंजिन उपलब्ध करुन देता येणार नसलं त्यामुळे नव्या मॉडलंच नाव देखील वेगळं असणार आहे. कारण नव्या मॉडेलमुळे आरएक्स-१०० च्या ब्रँड इमेजला धक्का पोहोचण्याचा धोका कंपनी पत्करणार नाही. त्यामुळे आरएक्स-१०० चं नवं मॉडल नवीन पद्धतीनं तयार केलं जाणार आहे.
यामाहा कंपनीनं आरएक्स-१०० ला बाजारात आणण्यासाठी एक व्यवस्थित प्लान तयार केला असल्याचीही माहिती चेअरमन चिहाना यांनी दिली आहे. त्यामुळे आरएक्स-१०० नव्यानं भेटीला येणार हे निश्चित झालं आहे.
Yamaha RX100 ची जादू यामाहा कंपनीनं १९८५ च्या सुमारास RX100 भारतीय बाजारात आणली होती. त्यावेळी खास जपानवरुन ५ हजार बाइक मागवण्यात आल्या होत्या. बाइकचं वजन फक्त ९८ किलो, इंजिन १०० सीसी, ११ बीएचएच टू-स्ट्रोक इंजिन आणि ७,५०० चा RPM सह उपलब्ध होती. RX100 नं लॉन्च होताच भारतात धुमाकूळ घातला होता.
आरएक्स-१०० बाइकची क्रेझच काही वेगळी होती. कॉलेजच्या तरुणाईचं आकर्षण होती. अगदी सिनेमात हिरो असो किंवा व्हिलन...स्टंटसाठी आरएक्स-१०० चीच निवड केली जायची. त्यावेळी ही बाइक १९ हजार रुपयांना मिळत होती.