पैसे न देता घरी आणू शकता शानदार Bike; दर महिना भरा ४,८७३ रुपये, जाणून घ्या स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 02:20 PM2023-01-25T14:20:19+5:302023-01-25T14:32:29+5:30

तुटपुंज्या बजेटमुळे तुम्हाला बाईक मिळत नसेल, तर फार काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशाच एका अप्रतिम बाईकबद्दल सांगत आहोत, जी तुम्ही कोणतेही पैसे न भरता तुमच्या घरी आणू शकता.

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी येझदी(Yezdi) शून्य डाऊन पेमेंटवर आपली कोणतीही बाइक घरी घेऊन जाण्याची संधी देत ​​आहे. येझदीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत बाइक्सची अनेक कॅटेगिरी लॉन्च केली आहे

ज्यात रोडस्टर, अॅडव्हेंचर आणि स्क्रॅम्बलर सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. तुम्हालाही कमी किंमतीत बाईक घ्यायची असेल तर हा लेख फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया, नेमकी कंपनीची ऑफर काय आहे आणि किती EMI तुम्हाला भरावा लागेल.

Yezdi च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ब्रँडमधून कोणतीही बाईक निवडू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला ५.९९% दराने सुलभ हप्त्यांमध्ये बाइक फायनान्स मिळेल. चार वर्षे चालणाऱ्या या फायनान्ससाठी, तुम्हाला मासिक हप्ता म्हणून ४,८७३ रुपये EMI भरावा लागेल.

ही ऑफर फक्त IDFC बँकेच्या वाहन वित्तपुरवठावर लागू आहे. मात्र, बाईक ऑनलाइन बुक करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून ५,००० रुपये भरावे लागतील. २०२२ मध्ये, येझदी बाइक्स २६ वर्षांनी भारतात परतल्या.

याआधी येझदी बाइक्स १९६० च्या दशकाच्या शेवटी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आल्या होत्या. नंतर ९० च्या दशकात त्याचे उत्पादन बंद करण्यात आले. मग या बाइक्स रोडकिंग, क्लासिक, मोनार्क या ब्रँडच्या नावांनी येत होत्या.

भारतीय बाजारपेठेत त्यांना जवळपास ३० वर्षे चांगलीच पसंती मिळाली होती. त्या काळातील अनेक चित्रपटांमध्येही या बाईक्स पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला येझदी रोडस्टर बाईकबद्दल सांगणार आहोत, तर चला एक नजर टाकूया

कंपनीने याला मस्क्युलर लूक आणि डिझाईन दिले आहे. यात स्प्लिट सीट मिळतात जे रायडर आणि मागे बसणाऱ्याला आरामदायी राईड देतात. बाईकमध्ये 334cc लिक्विड कूल्ड इंजिन आहे जे जास्तीत जास्त 29.7 PS पॉवर आणि 29 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. या व्यतिरिक्त, मोटरसायकलला ट्विन एक्झॉस्ट देखील मिळतो. या बाइकचे एकूण वजन १९४ किलो आहे, तसेच इंधन टाकीची क्षमता १२.५ लीटर आहे. त्याच वेळी, व्हीलबेसला 1440 मिमी आणि सीटची उंची 790 मिमी देण्यात आली आहे.

ही बाईक सिन सिल्व्हर, हंटर ग्रीन, स्मोक ग्रे, ग्लेशियल व्हाइट, गॅलंट ग्रे, इन्फर्नो रेड, स्टील ब्लू अशा ७ वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये या बाईकची किंमत २,०१,१४२ (एक्स-शोरूम) आहे. विविध शहरांत ही किंमत कमी-जास्त असू शकते

टॅग्स :बाईकbike