सिक्सर किंग युवराजला या पाच कार आवडतात फार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 17:12 IST2019-06-13T17:03:58+5:302019-06-13T17:12:42+5:30

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरविल्यानंतर भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंग याने निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्याच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावण्याची खेळी काही विसरता येणार नाही. यासाठी युवराजला कायम ओळखले जाईल. आजच्या न्युझीलंडसोबतच्या मॅचमध्ये युवराज नाही. त्याला महागड्या कारचाही भारी शौक आहे.
BMW M3 Convertible
तसे पाहता सर्वच महत्वाच्या क्रिकेटपटूंकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडिस, ऑडीसारख्या महागड्या कार आहेत. मात्र, युवराजकडे अशी कार आहे, जी बीएमडब्ल्यूने भारतात कधी विकलीच नाही. BMW M3 Convertible असे या कारचे नाव आहे. ही कार युवराजने निर्यात केलेली आहे. फार कमी कार भारतीय रस्त्यांवर धावतात. या कारला आयपीएलवेळी पाहिले गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली युवराजसोबत कारमध्ये बसला होता.
Lamborghini Murcielago
युवराजच्या ताफ्यात लॅम्बॉर्गिनी मुर्सीलागो एलपी 640-4 आहे. ही कार चालविताना युवराज दिल्लीमध्ये दिसला आहे. या कारमध्ये 6.5 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. बुद्ध इंटरनेशनल सर्किटवर ही कार दिसली होती. हा ट्रॅक फॉर्म्युला-1 मान्यता असलेला आहे.
BMW X6M
बीएमडब्ल्युची ही कारही भारतात फार विरळ दिसते. BMW X6M ही कार SUV-Coupe चे उच्च दर्जाचे मॉडेल आहे. अनेकदा युवराज ही कार चालवत असतो. युवराजने ही कार सेकंड हँड घेतली होती. DC Designs चे दिलीप छाब्रीया यांच्याकडून युवराजने ही कार खरेदी केली होती.
Audi Q5
युवराजला 2011 मधील वर्ल्डकपवेळी चांगले प्रदर्शन केल्याचे बक्षिस म्हणून ऑडी या कार कंपनीने Audi Q5 ही कार भेट दिली होती. ही कार बाजारातील लोकप्रिय कार आहे. ही कार जास्त रहदारीमध्ये चालविणे सोपे आहे.
Bentley Continental Flying Spur
या कारशिवाय युवराजकडे बेंटलीचीही कार आहे. Bentley Continental Flying Spur असे या कारचे नाव आहे. ही कारदेखिल युवराज बऱ्याचदा चालवितो.