हाँगकाँग ओपन सुपरसीरिजमध्ये सिंधू खेळली यंदाच्या मोसमातील चौथी अंतिम लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:07 IST2017-11-27T16:04:11+5:302017-11-27T16:07:41+5:30

हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताइ जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्ण पटकावले.
४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत यिंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली.
यंदाच्या मोसमात सिंधूने चार अंतिम लढती खेळल्या असून, त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत.