राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला अजिंक्यपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 23:30 IST2017-11-08T23:22:56+5:302017-11-08T23:30:28+5:30

नागपूर - राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूवर मात करत विजेतेपद पटकावले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत सायनाने सिंधूवर 21-17, 27-25 अशी मात केली. सायनाचे या स्पर्धेतील हे तिसरे विजेतेपद आहे.
सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यातील अंतिम लढत रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने पहिल्या गेममध्ये प्रत्येक पॉइंटसाठी चुरस दिसून आली.
सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यातील अंतिम लढत रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने पहिल्या गेममध्ये प्रत्येक पॉइंटसाठी चुरस दिसून आली.
पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ करून सायनावर हुकूमत राखली. पण उत्तरार्धात सायनाने जोरदार मुसंडी मारत 18-19 अशी आघाडी घेतली.
मात्र, सिंधूने पुन्हा खेळ उंचावत लढतीत 22-22 अशी बरोबरी साधली. मात्र सायनाने आपला अनुभव पणाला लावत हा गेम 27-25 अशा फरकाने जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला.