'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका! By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:59 PM 2018-09-25T16:59:44+5:30 2018-09-25T17:05:56+5:30
चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
चेहऱ्यावरून पिंपल्स दूर झाले की त्याचे डाग निर्माण होतात. त्यामुळे चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या निर्माण होते.
या डागांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य नाहीसं होतं.
अशा स्किनकेयर प्रोडक्टचा वापर करा, ज्यांमध्ये एएचए (अल्फा हायड्रोक्सी अॅसिड), ग्ल्यकोलिक अॅसिड आणि बीएच (बीटा हाइड्रोक्सी अॅसिड) यांसारख्या घटकांचा समावेश असेल.
पिंपल्सनंतर राहिलेले डाग जेव्हा सुर्य किरणांच्या संपर्कात येतात त्यावेळी ते आणखी वाढतात.
मार्केटमध्ये मिळणारे व्हिटॅमिन-सी सीरम चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या आणि डाग दूर होण्यास मदत होते.
स्किनकेअर प्रोडक्टबाबत माहिती नसेल तर एखाद्या डर्मेटोलॉजिस्टकडून त्यांची माहिती घेऊनच वापरा.