5 tips to get soft and silky hair naturally at home
'या' 5 पद्धतींनी कोरड्या आणि शुष्क केसांची घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:27 PM2019-04-23T17:27:53+5:302019-04-23T17:33:24+5:30Join usJoin usNext सौंदर्य वाढविण्यामध्ये केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. केस लांब असो किंवा लहान. त्यामुळे काहीही फरक पडत नाही. परंतु केस हेल्दी आणि मुलायम असतील तर प्रत्येकजण त्यांचं सौंदर्य न्याहाळतात. तसेच केस जर कोरडे आणि शुष्क असतील तर या समस्येपासून सुटका करण्यासाठी 5 सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही अवघ्या 2 आठवड्यांमध्ये केस पुन्हा मुलायम आणि सुंदर करू शकता. 1. असा करा शॅम्पूचा वापर हेल्दी केसांसाठी योग्य शॅम्पूचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. सध्या बाजारामध्ये विविध ब्रँडचे शॅम्पू असतात. परंतु यामध्ये केमिकल्सचे प्रमाण अधिक असते. जी केसांना डॅमेज करून त्यांना ड्राय करतात. त्यामुळे केमिकलयुक्त शॅम्पूमध्ये जर ग्लिसरीनचे प्रमाण अधिक असते. 2. प्रत्येकवेळी कंडिशनरचा वापर करा शॅम्पूनंतर केस धुण्यासाठी कंडिशनरचा वापर केल्याने केस मुलायम होतात. कंडिशनरचा क्रिमी इफेक्ट केसांना सॉफ्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हे काही वेळासाठी केसांना नॅचरली सॉफ्टदेखील करतं. जर केसांमध्ये स्प्लिट-एंड्स जास्त झाले असतील तर त्यांना रिपेअर करण्याचं काम कंडिशनर करतं. स्प्लिट-एंड्स जास्त झाल्यामुळे केस कोरडे आणि फ्रिजी होतात. 3. दररोज शॅम्पू करू नका काही लोकांना दररोज आंघोळ करताना शॉवर घेण्याची सवय असते. या व्यक्ती दररोज केसांना शॅम्पू करतात. परंतु असं करणं शक्यतो टाळा. आपल्या स्काल्पमध्ये एक खास ऑइल असतं. जे केसांना मुलायम करण्याचं काम करतं. हे ऑइल कमी जालं तर केस कोरडे दिसतात. त्यामुळे केसांना शॅम्पूची गरज भासते. 4. डिप कंडिशनिंग करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर आठवड्यातून एकदा केसांना डिप कंडिशनिंग करून घ्या. डीप कंडीशनिंगमुळे केसांना पोषण मिळतं. कोरडे केस आपोआप निघून जातात. केसांची ग्रोथही वाढते. डिप कंडिशनिंग केसांच्या आतमध्ये जाऊन हायड्रेट करून मुळापासून सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतात. 5. असं ऑइल लावा ज्याप्रकारे केसांना हेल्दी ठेवण्यासाठी योग्य शॅम्पूचा वापर करणं गरजेचं असतं. तसचं केसांसाठी योग्य ऑइल वापरणंही गरजेचं असतं. अशा ऑइलची निवड करा जे केसांना शॅम्पू केल्यानंतरही आपला इफेक्ट कायम ठेवतं. तुमचे केस जिथे अधिक कोरडे असतील तिथे ऑइल जास्त लावा. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सHair Care TipsBeauty Tips