5 way affect your hair during period
मासिक पाळीदरम्यान तुमचे केस गळतात का? हे उपाय करा By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 07:42 PM2018-12-28T19:42:42+5:302018-12-28T19:56:05+5:30Join usJoin usNext 1. तेलकट केस : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या हार्मोन्स लेव्हलमध्ये बदल होत असतात. मासिक पाळी येण्याच्या काही दिवसांपूर्वी Oestrogen आणइ Progesterone ची पातळी कमी होते. तर दुसरीकडे, Testosterone ची पातळी वाढते. यादरम्यान शरीरात तैल ग्रंथी जलदगतीनं तयार होतात, याचमळे त्वचा आणि स्कॅल्प तेलकट होते. 2.तेलकट केसापासून असा करा बचाव : केस धुण्यासाठी प्रोटीनयुक्त नैसर्गिक घटक असलेला हर्बल शॅम्पू वापरावा. यामुळे केवळ केसांना पोषकतत्त्वच मिळतातच, शिवाय केसगळती आणि तेलकट स्कॅल्पच्या समस्येपासूनही सुटका होते. 3. Sensitive स्कॅल्प : मासिक पाळीदरम्यान स्कॅल्प (कवटीवरील त्वचा)तेलकट होण्यासहीत अधिक Sensitive देखील होते. मासिक पाळीच्या काळात शरीरात अधिक प्रमाणात प्रोस्टाग्लँडिन तयार होते आणि ते हार्मोन्सची Sensitivity वाढवते. यामुळे स्कॅल्प अधिक Sensitive होते. अशा परिस्थितीत केसांवर ब्लो ड्राय, कलर, केमिकल्सयुक्त ट्रिटमेंट करू नये. 4. ओपन पोर्सची समस्या: मासिकपाळीदरम्यान तैलग्रंथी वाढल्यानं स्कॅल्पवरील छिद्र (Open Pores)प्रचंड प्रमाणात वाढतात. यावेळेस उशीचे कव्हर वेळोवेळी धुवून स्वच्छ करावे. 5. ओपन पोर्सवरील उपाय : ओपन पोर्स कमी करण्यासाठी टोनर किंवा एस्ट्रिंजेंटचा वापर करावा. यासाठी नैसर्गिक गोष्टी उदाहरणार्थ अॅप्पल सायडर व्हिनेगर, हेअर मास्कसाठी अंड्याचा पांढरा भाग अधिक फायदेशीर ठरतो. 6. केसगळती : मासिक पाळीच्या सुरुवातीस ओस्ट्रोजनची पातळी खूपच कमी होते. यामुळे केसगळती प्रचंड प्रमाणात होते. ही समस्या गरोदरपणानंतर आणि मासिकपाळी बंद झाल्यानंतरही पाहायला मिळते. टॅग्स :केसांची काळजीआरोग्यहेल्थ टिप्सHair Care TipsHealthHealth Tips