9 best easy tips and tricks to color and dying your hair at home
केसांना कलर करण्यासाठी 'या' 9 टिप्सचा करा वापर! By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:01 PM2018-10-17T12:01:14+5:302018-10-17T12:15:54+5:30Join usJoin usNext अनेकदा पांढऱ्या होणाऱ्या केसांना लपवण्यासाठी हेअर कलरचा आधार घेण्यात येतो. त्यासाठी बाजारात मिळणारी उत्पादनं निवडून घरच्या घरी किंवा पार्लरमध्ये जाऊन केसांना कलर करण्यात येतं. केसांना केलेला कलर जास्त दिवस कसा टिकेल या गोष्टीचा जास्त विचार करण्यात येतो. जर तुमचीही अशीच काही इच्छा असेल तर जाणून घेऊयात केसांना केलेला कलर जास्त दिवस टिकवण्यासाठी काही टिप्स... हेअर कलर केसांवर तेव्हाच खूप वेळ टिकू शकेल जेव्हा कलर करण्याआधी केसांवर लक्ष देण्यात येईल. कलर करण्यापूर्वी एक महिनाआधी केसांच्या मजबूतीवर लक्ष देणं गरजेचं असतं. आठवड्यातून कमीतकमी तीन वेळा केसांना तेल लावा. केसांची निगा राखा. मोठ्या प्रमाणात केस गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर हेअर कलर करा. जेव्हा तुम्ही केसांना कलर करणार असाल त्यावेळी तुमच्या केसांनुसार योग्य त्या प्रोडक्टचा वापर करा. जर याआधी हेअर कलर करताना केसांना त्रास झाला असेल तर यावेळी प्रोडक्ट बदलून वापरा. जर तुम्ही स्वतः घरच्या घरीच केस कलर करणार असाल तर केस कलर करण्यासाठी आणलेल्या प्रोडक्टवर लिहिलेल्या सर्व सुचना नीट वाचा आणि त्यानुसार कलर करा. हेअर कलर केल्यानंतर केसांना काही दिवसांपर्यंत केस धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरू नका. जर पहिल्या आठवड्यात 3 ते 4 वेळा शॅम्पू करत असाल तर आता कमी करून 2 ते 3 वेळा करा. हेअर कलर केल्यानंतर डॅमेज झालेल्या केसांना ट्रिम करा. नाहीतर केसांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हेअर कलर केल्यानंतर कोणत्या शॅम्पूचा वापर करायचा या गोष्टीवर लक्ष द्या. शॅम्पूसोबत चांगल्या कंडिशनरचाही वापर करा. केसांसाठी शॅम्पू जेवढा गरजेचा आहे तितकाच कंडिशनरही महत्त्वाचं आहे. याचा चुकीचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते. हेअर कलर केल्यानंतर केस अधिक ड्राय होऊ लागतात. त्यामुळे केस मॉयश्चराइझ करणं गरजेचं असतं. काही होम मेड हेअर पॅक केसांना लावा. मध, कोरफड, दही, कोकनट मिल्क यांसारख्या गोष्टी स्काल्प आणि केसांना लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते. काही लोकांचा असा समज आहे की, हेअर कलर केल्यानंतर केसांना कमी तेल लावावं. परंतु असं केल्याने केस आणखी कमजोर होतात. परिणामी ते आणखी तुटतात. टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनBeauty Tipsfashion