'देवसेने'सारखी ग्लोइंग त्वचा हवी? फॉलो करा तिच्या ब्यूटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:38 PM2018-11-06T15:38:39+5:302018-11-06T15:49:19+5:30

बाहुबलीची देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीचा आज ३७वा वाढदिवस आहे. साऊथ सिने इंडस्ट्रीतील टॉप हिरोईन्सपैकी अनुष्का एक आहे. त्यामुळे साऊथमध्ये तिच्या सुंदरतेची चर्चा सतत होत असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या सुंदरतेच्या आणि फिटनेसच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करुन तुम्हीही तिच्यासारखं सौंदर्य मिळवू शकता.

- अनुष्काला निसर्ग फार प्रिय आहे आणि स्वत:ला सुंदर करण्यासाठी ती निसर्गाचीच मदत घेते. तिचं असं मत आहे की, त्वचेवर नैसर्गिक तजेलदारपणा आणायचा असेल तर केवळ जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी हेच त्वचेशी निगडीत प्रत्येक समस्येवर उपाय आहे. (Image Credit : WikiBio)

- सर्जरी आणि महागड्या कॉस्मेटिकचा वापर दररोज करण्यापासून ती दूर राहते. त्याऐवजी ती नैसर्गिक ट्रिटमेंटला प्राधान्य देते. त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी अनुष्का लिंबाचा रस आणि बेसन नियमीतपणे वापरते.

- अनुष्का रोज सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड आणि मध खाते. मध तिच्या त्वचेला आतून सुंदर करतं आणि शरीर फिट ठेवण्यासाठी मदत करतं.

अनुष्काची त्वचा आणि केसांचं सर्वात मोठं गुपित हे जास्तीत जास्त नारळाचं पाणी पिणे हे आहे. त्यासोबतच केसांसाठी ती आणखीही काळजी घेते.

अनुष्का नियमीत रुपाने आपल्या केसांना तेल लावते. त्यात ऑलिव ऑईल, मस्टर्ड ऑईल, कोकोनट ऑईल या तेलांचा समावेश आहे. या तेलांनी तिच्या केसांना नैसर्गिक ग्लो आणि चमकदारपणा मिळतो.

शरीर फिट आणि अॅक्टिव ठेवण्यासाठी अनुष्का जिममध्ये जाण्यावर विश्वास ठेवत नाही. ती केवळ योगाभ्यासाचा आधार घेते. रोज योगाभ्यासाने ती दिवसाची सुरुवात करते.

योगाभ्यासासोबतच ती ३० मिनिटे एक्सरसाइज करते. ही एक्सरसाइज केवळ तिचा ऊर्जा वाढवण्यासाठी केली जाते.

अनुष्का स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्यावर विश्वास ठेवते. रोजच्या आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश असावा यावर तिचं लक्ष असतं. तसेच फळांचाही समावेश असतो. त्यासोबतच अनुष्का कोणत्याही परिस्थितीत डिनर रात्री ८ वाजता करण्याचा प्रयत्न करते.