जसा काळ बदलत आहे त्यानुसार अभिनेत्री आपल्या लूकमध्ये बदल घडवत असतात. त्यासाठी त्या सर्जरी, मेकअपबरोबरच आयब्रोज स्टाइलमध्ये बदल असे नवनवीन प्रयोग आणि उपाय करत असतात. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे काजोल होय. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत काजोलने आपल्या आयब्रो स्टाइलविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली होती, ‘जुळलेल्या आणि दाट आयब्रोजसोबत स्क्रिनवर झळकण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझा मित्र मिकीने माझ्या निर्णयावर विश्वास दाखवला आणि म्हटले, की अशा आयब्रोजमुळे तू इतर अभिनेत्रींपेक्षा स्क्रिनवर वेगळी दिसशील आणि लोकांना पसंतसुद्धा पडशील.’ मित्राचा सल्ला ऐकल्यानंतर काजोलने वयाच्या १७ व्या वर्षी 'बेखुदी' (१९९२) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे दाट आणि जुळलेल्या आयब्रोजमुळे काजोलला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळा लूक मिळाला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.काजोल सुपरहिट ठरलेल्या 'बाजीगर' या सिनेमात जाड आयब्रोजमध्ये दिसली होती. काही वर्षांनंतर काजोलने आयब्रोज थोड्या बारीक केल्या आणि जुळलेल्या तिच्या आयब्रोजला वेगळा शेप मिळला.या अभिनेत्रींनीही बदलली आपली आयब्रोज स्टाइल पुर्वी करिश्मा कपूरच्याही आयब्रोज जाड होत्या. मात्र काळानुसार तिनेही स्वत:च्या लूकमध्ये बदल करण्यासाठी आयब्रोज स्टाइल बदलली. आता ती बारीक आयब्रोज ठेवते. आलिया भटनेही आपली आयब्रोज स्टाइलमध्ये बदल केला आहे. ती अगोदर जाड आणि आता बारीक आयब्रोज ठेवते.अनुष्का शर्माच्या आयब्रोजमध्येही बदल झालेला बघायला मिळतो. पूर्वी तिच्या आयब्रोज बारीक होत्या. मात्र आता त्या जाड दिसतात. करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोण बारीक आयब्रोज ठेवायची. मात्र आता तिच्या आयब्रोज दाट आहेत.कंगना रनोट पुर्वी बारीक आणि आता जाड आयब्रोज ठेवते. काळानुसार करीना कपूरनेही तिच्या आयब्रोजचा शेप बदलला आहे.प्रियांका चोप्रानेसुद्धा तिच्या आयब्रोजच्या शेपमध्ये बदल केला आहे. पुर्वी तिच्या आयब्रोज बारीक असायच्या.