Beauty Tips Home remedies for pimples and acne
पिंपल्स आणि डागांपासून होईल सुटका; फक्त करा 'हे' घरगुती उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:17 PM2019-10-13T12:17:57+5:302019-10-13T12:25:47+5:30Join usJoin usNext सध्या वातावरण बदलत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम त्वचेवर होत आहे. या वातावरणात समस्या ही विनाकारण येणाऱ्या पिंपल्सची असते. असातच आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. एवढचं नाहीतर यामुळे पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डागही दूर होतील. सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, पिंपल्स दोन प्रकारचे असतात. नॉन-इंफ्लेमेटरी आणि इंफ्लेमेटरी. व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स नॉन-इंफ्लेमेटरी पिंपल्स असतात. तर इंफ्लेमेटरीमध्ये पॅप्युल्स, पस्ट्यूल, नोड्यूल आणि सिस्ट असतात. ज्यामुळे दाग आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला इंफ्लेमेटरी पिंपल्सबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय... खोबऱ्याचं तेल खोबऱ्याचं तेल पिंपल्सवर लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी पाण्याने धुवून टाका. यामध्ये असणारे अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-ई त्वचेवरील पिंपल्स दूर करतात. तसेच अॅक्नेही दूर होतात. सफरचंदाचं व्हिनेगर कापसाच्या मदतीने सफरचंदाचं व्हिनेगर पिंपल्सवर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं पाण्याने धुवून घ्या. यामध्ये असणारे अॅन्टी-मायक्रोबियल गुणधर्म पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. कोरफड कोरफडीचा गर पॉलीसॅकराइड आणि जिबरेलिंस यांसारख्या पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि तजेलदारही होते. संत्र्याची साल संत्र्याच्या सालीची पावडर आणि मध एकत्र करून लावल्याने पिंपल्स दूर होतात. त्याचबरोबर त्वचा उजळण्यासही मदत होते. बेकिंग सोडा पाण्यामध्ये 2 टिस्पून बेकिंग सोडा एकत्र करून पिंपल्सच्या डागांवर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. हे त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यासोबतच पीएच लेव्हल संतुलित करतं. (टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीSkin Care TipsBeauty TipsWinter Care Tips