Beauty Tips to make legs fair and sexy in summer season
प्रखर उन्हातही पायांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'हे' उपाय करा ट्राय By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:17 PM2019-05-30T17:17:33+5:302019-05-30T17:26:48+5:30Join usJoin usNext उन्हाळ्यामध्ये हॉट पॅन्ट्स किंवा हॉट शर्ट्स, मिडीज फॅशन आणि कंम्फर्ट म्हणून परफेक्ट आहे. हे आउटफिट्स वेअर करण्याआधी गरजेच आहे की, तुमचे पाय सुंदर दिसावेत. परंतु उन्हामध्ये बाहेर निघाल्यामुळे टॅनिंग आणि रॅशेजचा धोका राहतो. पण तुम्ही उन्हाळ्यातही तुमचे पाय सुंदर ठेवू शकता. त्यामुळे उन्हाळ्यातही पायांचं सौंदर्य टिकवण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत. जाणून घेऊया काही उपाय...पेडीक्योर आठवड्यामध्ये एकदा तरी फुट मसाज घ्या. यामुळे तुमचे पाय क्लीन राहतील. पायाची नखं वाढवू नका. त्यामुळे त्यामध्ये घाण साचणार नाही. खोबऱ्याचं तेल झोपण्यापूर्वी खोबऱ्याचं तेल पायांना लावून मसाज करा. हे तेल कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं आणि स्किन मॉयश्चराइज करतं. तसेच हे स्किन सेल्सलाही पोषण देतात. तसेच स्किन सेल्स स्वच्छ करतात. तेल पायांना रात्रभर लावून ठेवा. शक्य असल्यास कॉटन सॉक्स वेअर करा. प्यूमिक स्टोन घरीच पटकन पेडीक्योर करायचं असेल तर प्यूमिक स्टोन बेस्ट आहे. हे पायांवरील डेड स्किन सेल्स काढून टाकतात आणि पायांची त्वचा सॉफ्ट करतात. स्किन लाइटनिंग धूळ-माती जमा झाल्यामुळे आणि टॅनिंगमुळे अनेकदा गुडघ्यांचा कलर डार्क होतो. आंघोळ करण्याआधी लिंबू कापून गुडघ्यांवर मालिश करा. यामध्ये असलेलं सायट्रिक अॅसिड नॅचरल ब्लीचिंगचं काम करतात. सन प्रोटेक्शन उन्हामध्ये बाहेर निघण्याआधी पायांवर सनस्क्रिन लावा. जास्तीत जास्त लोक सनस्क्रीन फक्त चेहऱ्यावर लावतात. प्रयत्न करा की, उन्हामध्ये एक्सपोज होणाऱ्या संपूर्ण स्किनवर सनस्क्रिन लावा. (Image Credit : Calypso sun) टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्ससमर स्पेशलSkin Care TipsBeauty TipsSummer Special