Beauty Tips for Permanent beauty and skin glow
चेहऱ्याचा ग्लो टिकवून ठेवायचाय?; मग शरीराच्या 'या' अवयवांची काळजी घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:26 PM2019-08-27T12:26:26+5:302019-08-27T12:33:58+5:30Join usJoin usNext सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. हेल्दी डाएट घेण्यासोबतच बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही आधार घेण्यात येतो. पण एवडं करूनही सर्व उपया निष्फळ ठरतात. चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसते. पण जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो टिकवून ठेवायचा असेल तर थोडा विचार करा आणि नक्की समस्या काय आहे ते जाणून घ्या... गळणारे केस आणि निस्तेज त्वचा... हेअर ट्रिटमेंट घेतल्यानंतरही केस गळण्याचं प्रमाण कमी होत नाही. फेस मास्क आणि फेस पॅक वापरल्यानंतरही त्वचा निस्तेज दिसते, अशा समस्या सध्या वाढत आहे. ब्युटी प्रोडक्ट्स देतात फक्त बाहेरून उजाळा अनेकजण अनेक विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु, हा आपल्या सौंदर्याचा गुरूमंत्र ठरू शकत नाही. आपण ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करून काही वेळासाठी सुंदर दिसू शकतो. परंतु, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो टिकवून ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहणं आणि हेल्दी डाएट घेणं तेवढचं फायदेशीर ठरतं. मेकअप क्षणिक सौंदर्य वाढविण्यासाठी काही व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअपचा आधार घेतात. पण मेकअपमुळे तुम्ही काही तासांसाठीच सुंदर दिसू शकता. परंतु, रेग्युलर वापर केल्याने तुमचं सौंदर्य वाढविण्याऐवजी कमी करण्यासाठी मदत करतो. हेल्दी डाएट घेता का? अनेक लोकांची अशी तक्रार असते की, आम्ही हेल्दी डाएट घेतो, तसेच रूटिन लाइफमध्ये हेल्थचीही काळजी घेतो पण तरिसुद्धा चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही. पण आपण अनेकदा काही गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. आपण हेल्दी डाएट घेतो पण कधी विचार केलाय का? जे डाएट घेतो ते व्यवस्थित पचतं का? त्यातील पौष्टिक घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळतात का? हेल्दी डाएटचा योग्य फायदा होत नाही... आम्ही हेल्दी डाएट फॉलो करतो, परंतु, आरोग्य आणि सौंदर्य कशासाठीच फायदा होत नाही. जर तुमचीही अशीच तक्रार असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींसोबतच तुमच्या लिव्हरवरही लक्ष देणं गरजेचं आहे. जर लिव्हर ठिक नसेल तर कितीही हेल्दी डाएट घेतलं तरिही त्याचा संपूर्ण फायदा होत नाही. त्वचेसाठी आणि केसांसाठी या गोष्टी ठरतात फायदेशीर प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेटयुक्त डाएटचा फायदा आपल्या केसांना आणि त्वचेला तेव्हाच मिळेल जेव्हा पचनक्रिया सुरळीत होईल. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी तुमची पचनक्रिया सुरळीत असणं आवश्यक असतं. वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि थोडीशी काळजी घेतली तर आरोग्यासोबतच त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठीही मदत होईल. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सकेसांची काळजीहेल्थ टिप्सSkin Care TipsBeauty TipsHair Care TipsHealth Tips