Daily mistakes make your hair colour fade out sooner than expected
तुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:19 PM2020-01-22T17:19:03+5:302020-01-22T17:35:02+5:30Join usJoin usNext मुली केस सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केसांची ट्रिटमेंट घेत असतात. हेअर कलर किंवा सोनेरी, लाल, तांबड्या रंगाचे आकर्षक केस मिळवण्यासाठी हाटलाईट करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या काही चुकांमुळे केसांना केलेला कलर किंवा हायलाईट निघून जातो. त्यामुळे तुमचे संपूर्ण केस खराब होऊ शकतात. केसांना पोषण मिळण्यासाठी मॉईश्चराईजर लावण्याची गरज असते अन्यथा केस कोरडे पडण्याची शक्यता असते. हाइड्रेटिंग मास्कचा वापर केसांवर कमीतकमी आठवड्यातून २ वेळा करावा. केसांची काळजी घ्यायची असल्यास केस कलर केल्यानंतर हेअरस्पा सतत करणं केसांसाठी नुकसानकरक ठरू शकतं. त्यासाठी फक्त महिन्यातून एकदा हेअरस्पा करा. ज्यामुळे तुमच्या केसांची चमक टिकून राहील. अनेकदा तुमचा निष्काळजीपणा केस गळण्याचे कारणं ठरू शकतो. कारण फक्त महागडे स्पा नाहीतर घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही केस ठेवता कसे बांधता हे सुद्धा महत्वाचं असतं. केस जास्त धुतल्यामुळे तुमच्या केसांचा कलर लाईट होऊ शकतो. जर तुम्ही आठवड्यातून दोनपेक्षा जास्तवेळा केस धुवत असाल तर तुमच्या केसांचा रंग पुर्णपणे निघून जाण्याची शक्यता असते. केस धुण्यासाठी चुकिच्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. कारण केसांना कलर करत असताना केसांना खूप केमिकल्स अप्लाय झालेले असते. त्यामुळे केसांची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज असते. युव्ही रेज् मुळेसुद्धा केस खराब होत असतात. हाटलाईट केलेल्या केसांना जास्तवेळ उन्हाचा सामना करावा लागला तर केसांचा रंग लाईट होण्याची शक्यता असते. तसंच केसांना क्रिम लावताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. केसांचा केलेला कलर अनेक दिवस टिकून राहावा असं वाटत असेल तर केसांची योग्य पध्दतीने काळजी घेणे आवश्यक आहे. केस धुतल्यानंतर टॉवेलला गुंडाळून जास्तवेळ ठेवू नका. त्यामुळे केस खराब होऊ शकतात.टॅग्स :ब्यूटी टिप्सBeauty Tips