Diy Makeup and beauty products at home
खरेदी करू नका, तर घरीच तयार करा महागडे ब्युटी प्रोडक्ट्स; होतील अनेक फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 02:24 PM2019-07-07T14:24:52+5:302019-07-07T14:31:56+5:30Join usJoin usNext पार्लरमध्ये न जाता आणि महागडे प्रोडक्ट्स न वापरताही तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसत असाल तर खरचं कौतुक करण्याची गोष्टी आहे. पण सध्याच्या या प्रदूषणरहित वातावरणामध्ये असं कादचितच कोणी असेल. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा आधार घेतात. पण यामध्ये अशा काही महिलांचा समावेश असतो. ज्यांना महागड्या मेकअप प्रोडक्ट्सवर अजिबात पैसे खर्च करायला आवडत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्स बाजारातून खरेदी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच मेकअप प्रोडक्ट्स तयार करू शकता. हायलाइटर हाय-फाय हायलायटरसाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याती अजिबात इच्छा नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिप ग्लॉस वापरू शकता. कोणतंही क्लियर लिप ग्लॉस हायलायटरप्रमाणे काम करतं. नॅचरल ग्लोसाठी तुम्ही हे चीकबोन्सवर अप्लाय करू शकता. तसेच खोबऱ्याच्या तेलामध्ये शिमर पिगमेंट एकत्र करूनही तुम्ही हायलायटर म्हणून वापरू शकता. बीबी क्रीम जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लाइट मेकअप बेस पाहिजे असेल तर थोडसं मॉयश्चरायझरमध्ये थोडं लिक्विड किंवा पावडर फाउंडेशन एकत्र करून तुम्ही घरीच बीबी क्रिम तयार करू शकता.लिप स्क्रब जर तुमचे ओठ फार कोरडे पडले असतील तर घरी पेट्रोलियम जेली आणि साखर एकत्र करून स्क्रब तयार करा. यामुळे तुमचे ओठ स्मूद होण्यास मदत होइल. ब्रो पाउडर जर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट असेल तर ब्रो पावडरसाठी पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही डार्क ब्राउन किंवा ग्रे कलर्सला आयब्रो पावडरप्रमाणे वापर करू शकता. ब्रश क्लीनर्स मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी महागडे सोल्यूशन्स बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला यावर पैसे खर्च करायचे नसतील तर रेग्युलर शॅम्पू गरम पाण्यामध्ये एकत्र करून त्यामध्ये ब्रश स्वच्छ करा. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीBeauty TipsSkin Care Tips