उन्हाळ्यामध्ये केस हेल्दी आणि शायनी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 06:03 PM2019-04-07T18:03:49+5:302019-04-07T18:09:21+5:30

सौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. अनेक महिला मोठे केस ठेवणं पसंत करतात. मात्र उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. केसांचा मजबूतपणा आणि चमक टिकवण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.

उन्हाळ्यामध्ये एका आठवड्यात 3 ते 4 वेळा केस धुवा. घरातून बाहेर पडताना डोक्यावर ओढणी घ्या. उन्हाळ्यात केस मोकळे सोडू नका. स्कार्फचा वापर करा.

उन्हाळ्यात केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी योग्य आणि पोषक पदार्थांचे सेवन करा. तसेच स्मूदिंग किंवा रिफ्रेशिंग स्कॅल्प मास्कचा वापर करू शकता.

केसांवर कोणताही स्प्रे मारू नका तसेच जेलही लावू नका. उन्हाळ्यात केस गरम पाण्यांनी धुवू नका. तसेच हेअर ड्रायरचा वापर जपून करा.

रात्री झोपताना डोक्याला हलका मसाज करा. केसांचे स्वास्थ राखण्यासाठी त्याची मदत होईल. केस धुण्यासाठी चांगल्या शॅम्पूचा वापर करा.

केस शायनी ठेवण्यासाठी केसाची योग्य काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्या. उन्हात जास्त फिरू नका.