पेडिक्योर करण्यासाठी 'या' नॅचरल ऑइल्सचा वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 07:10 PM2018-11-14T19:10:14+5:302018-11-14T19:15:25+5:30

चेहरा आणि केसांप्रमाणेच हात आणि पायांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पायांचं सौंदर्य वाढविण्यासाठी पेडिक्योर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. अनेकदा पार्लरमध्ये पेडिक्योर करण्यात येतं. त्यासाठी अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. पण अशावेळी घरच्या घरी पेडिक्योर करणं उपयुक्त ठरतं. तसेच त्यासाठी घरगुती उपाय करणं अधिक परिणामकारक ठरतं. यासाठी तुम्ही गुलाब पाणी, संत्र्याच्या सालींची पावडर आणि इसेंशिअल ऑइल वापरू शकता. या सर्व गोष्टी आपल्याला रिफ्रेश करण्याचं काम करतील त्याचप्रमाणे स्ट्रेस कमी करण्यासाठीही परिणामकारक ठरतील. तुम्हीही या नॅचरल ऑइल्सचा वापर करून पेडिक्योर करू शकता. पाय सुंदर होण्यासोबतच आरामही मिळेल.

पेपरमिंट इसेंशियल ऑइल फक्त औषधी गुणधर्मांसांठीच नाही तर आपल्या सुगंधासाठीही ओळखले जातात. या सुगंधामुळे मन प्रसन्न होण्यास मदत होते. यामध्ये असलेलं अॅन्टी-इंफ्लेमेटरी मेन्थॉल त्वचेला आराम देतं. त्याचसोबत याचा सुगंधी मूड फ्रेश करण्यास फायदेशीर ठरतं.

टी-ट्री ऑइलमध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे पायांना येणाऱ्या दुर्गंधापासून आणि बॅक्टेरियापासून बचाव करण्याचं काम करतात.

लव्हेंडर ऑइल फक्त चांगल्या सुगंधासाठी ओळखले जाते. पायांना येणारी दुर्गंधी आणि बक्टेरिया घालवण्यासाठी हे फायदेशीर ठरतात.

लेमन इसेंशियल ऑइलचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो. तसेच यामध्ये असणारे लिंबाचे गुणधर्म पायांच्या समस्या दूर करून स्ट्रेस फ्री करण्याचं काम करतं.