Home remedies for curing dark spots on skin
'हे' घरगुती उपाय चेहऱ्यावरील Dark spots दूर करण्यासाठी करतात मदत! By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:30 PM2019-04-24T19:30:31+5:302019-04-24T19:36:49+5:30Join usJoin usNext सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. धूळ आणि उन्हापासून त्वचेचं रक्षण न केल्यामुळे चेहऱ्यावर डाग येतात. हे डाग दूर करण्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो. अशातच या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेला कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत आणि त्वचेचं आरोग्य राखण्यासही मदत होते. बटाटा एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा. कापलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवा आणि डार्क स्पॉट्सवर लावा. बटाटा घेऊन 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. दही दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी मदत होते. हे स्पॉट असणाऱ्या त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. खोबऱ्याचं तेल खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी नुकसानदायी असतं. तसेच ते यूवी रेपासून त्वचेचं रक्षण करतं. सर्वात आधी चेहरा स्वच्छ करा. त्यामुळे चेहऱ्यावरील धुळ आणि इतर प्रदुषक तत्व दूर होतात. त्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने मसाज करा. 20 ते 25 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चंदन चंदन त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतं. चंदनाची पेस्ट लावण्यासाठी थोडसं चंदन आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. 1 ते 20 मिनिटांनी धुवून टाका. (Image Credit : Sabhindime) टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सSkin Care TipsBeauty Tips