Home remedies for sun tan
उन्हामुळे पाय काळसर झालेत ? नक्की करा हे घरगुती उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 06:29 PM2018-04-26T18:29:48+5:302018-04-26T18:29:48+5:30Join usJoin usNext उन्हाळ्यात चेहऱ्यासोबतच हातांची व पायांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्यात आपण चप्पल घालतो तेवढा भाग वगळता काही भाग काळसर पडतो. याच समस्येवर काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १) लिंबाचे दोन भाग करून त्यापैकी एक भाग काळसर झालेल्या ठिकाणी चोळून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. ही कृती दिवसातून दोनदा केल्याने फरक दिसेल २) टोमॅटो आणि कोरफडीचा गर पायांना लावल्यास पायांची त्वचा तजेलदार दिसते व काळसरपणा निघून जाईल. ३) ताकामध्ये गरम पाणी व ओट्स मिश्रित करून या मिश्रणाने पाय धुवा त्यामुळे पाय उजळ दिसतील ४) चमचाभर दही पायांवर टाकून १० ते १५ मिनिटे मसाज करा. यामुळे उन्हामुळे काळसर झालेले पाय पूर्वीसारखे दिसतील. ५) बटाट्याच्या कापांमध्ये दूध मिश्रित करा. काही वेळाने कापा पायांवर चोळा. लगेचच फरक दिसून येईल.टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सBeauty TipsHealthHealth Tips