home remedy and Healthy food for flawless skin
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत! By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 07:49 PM2019-01-23T19:49:09+5:302019-01-23T19:55:50+5:30Join usJoin usNext त्वचेचं सौंदर्य आणि तारूण्य टिकवण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही ब्युटी फूड्सबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही त्वचेचं सौंदर्य टिकवू शकता. तसेच त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणंही कमी होतात. कारण प्रत्येकवेळी बाजारा मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणं गरजेचं नसतं. काही पदार्थांमध्येही सौंदर्याचं राज लपलेलं असतं. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आढळून येतं. हे एक अॅन्टी रिंकल एजंट आहे. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. दररोज आहारामध्ये दह्याचा समावेश केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात. दह्यामध्ये झिंक आणि कॅल्शिअम आढळून येतं. त्यामुळे दह्याचं सेवन करणं आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. ब्रोकलीही सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये एक असं अॅसिड आढळून येतं. जे पायांची त्वचा मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर असतंच पण सौंदर्यासाठीही लाभदायक ठरतं. यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. ज्यांच्या सेवनाने उन्हापासून त्वचेचं रक्षण होतं आणि स्किन कॅन्सरपासूनही बचाव होतो. डार्क चॉकलेट, ग्रीन टी आणि रेड वाइनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होते. टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्सHealthy Diet PlanHealth TipsHealthBeauty Tips