कलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:32 PM2018-10-23T16:32:37+5:302018-10-23T17:01:10+5:30

स्किनसाठी महिला आणि तरूणी अनेक उपाय करत असतात. त्यासाठी सतत पार्लरच्या वाऱ्या घालण्यात येतात तर अनेकदा बाजारामध्ये मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. अनेक महिलांची स्किन सेंसिटिव्ह असते त्यामुळे त्यांना अनेक ब्युटी प्रोडक्ट्स सुट होत नाहीत. अशावेळी तुम्ही घरच्या घरी काही उपायांनी तुमचं सौंदर्य आणखी वाढवू शकता. जाणून घेऊया कलिंगडापासून फेस पॅक्स तयार करून बदलत्या वातावरणामध्ये होणाऱ्या स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका करता येते.

कलिंगडामध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंट सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही त्वचेचं रक्षण करतात. तसेच हे त्वचेसाठी नॅचरल मॉयश्चरायझर म्हणून देखील काम करतात. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील मृत पेशी हटवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे स्किनवर एक नॅचरल ग्लो येतो.

एक चमचा कलिंगडाच्या रसामध्ये एक चमचा एवोकॅडोचा पल्प मिक्स करा. तयार पेस्ट 20 मिनिटांर्यंत चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

हे पॅक तयार करण्यासाठी एक चमचा कलिंगडाच्या रसामध्ये एक चमचा दही मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

एका बाटलीमध्ये कलिंगडाचा ज्यूस भरून फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुलाब पाणी आणि तुळशीचा रसाचे काही थेंब मिक्स करा. तुमचं टोनर तयार आहे. दररोज कापसाच्या मदतीने हे टोनर चेहऱ्यावर लावा.