पुरूषांनी हॅण्डसम लूकसाठी सुट्टीचा 'असा' करा वापर नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:35 PM2020-03-26T15:35:40+5:302020-03-26T16:02:44+5:30

सध्या कोरोना व्हायरस भारतात सुद्धा पसरत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता यावं आणि सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. पण घरी बसून तुम्ही लॉकडाऊनपर्यंत तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. घरी बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

याचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्या कायममच्या दूर करू शकता. घरच्याघरी तुम्ही काही सहज उपलब्ध होत असलेल्या पदार्थांचा वापर करून आपली त्वचा चांगली ठेवू शकता.

चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी चेहरा ड्राय होऊ देऊ नका. चेहऱ्याचा ओलावा कायम ठेवण्यासाठी तुम्ही जेल बेस्ड एखाद्या मॉइश्चरायजरचा प्रयोग करु शकता. याचा तुम्ही दररोज वापर करु शकता.वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टींसोबतच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे

पाणी केवळ तुमची तहान भागवतं असं नाही तर तुमच्यासाठी औषध म्हणूनही काम करतं. पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यायाचा ग्लो नष्ट होतो. जर तुम्हाला चेहऱ्याची चमक कायम ठेवायची असेल तर दिवसातून कमीत कमी ८ लिटर पाणी प्यावं लागेल. याचा अर्थ एकावेळी फार जास्त पिऊ नये. दिवसभर थोडं थोडं पाणी प्यायल्यासही चालतं.

या उपायांनी तरूण रहा : दही हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही नैसर्गिक क्लिंन्झर म्हणून दह्याचा वापर करू शकता. दोन चमचे दही घेऊन तुम्ही रोज आपल्या चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या त्वचेला स्वच्छ करण्याचं काम दही करतं. त्याचप्रमाणे रोजच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठीही दह्याचा उपयोग होतो. दह्यामधील चांगले बॅक्टेरिया हे आपल्या त्वचेवरील धूळ आणि माती काढून त्वचा अधिक उजळ करण्याठी आणि स्वछ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये आढळून येणारे अॅन्टीऑक्सिडंट चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम होते आणि आवश्यक ते पोषण त्वचेला मिळतं. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून काही वेळ तसचं ठेवा.

गुलाब पाणी आपला चेहरा स्वच्छ करण्यासोबतच त्वचा मुलायम करण्यासाठीही मदत होते. गुलाब पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा. सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासोबत दूध त्वचेसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. कच्च्या दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. जी त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर कॉटनच्या मदतीने कच्चं दूध लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यास मदत होते.

मुलतानी मातीचे सौदर्यं प्रसााधनांमध्ये असलेले महत्व तुम्हाला माहितच असेल. मुलतानी मातीत कडूलिंबाचा पाला घालून फेसपॅक तयार करा आणि त्वचेवर लावून चेहरा धुवून टाका.