सुंदर आणि ग्लोईंग स्किनच्या लालसेपोटी 'या' चुका कराल, तर बोंबलत बसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 10:57 AM2020-03-15T10:57:31+5:302020-03-15T12:22:32+5:30

महिला असो किंवा पुरूष प्रत्येकालाच डागरहीत आणि चांगली त्वचा हवी असते. खासकरून महिलांना आपल्या त्वचेची खूप काळजी असते. त्यासाठी महिला नेहमीच महागड्या उत्पादनांपासून वेगवेगळ्या क्रिम्स वापरत असतात. तसंच ब्यूटी ट्रिटमेंट्स सुद्धा घेत असतात.

पण अनेकदा तुम्ही करत असलेल्या चुकांमुळें तुमच्या त्वचेला मोठा परिणाम सहन करावा लागू शकतो. सतत नकळतपणे आपल्याकडून त्याच त्यात चुका होत असल्यामुळे त्वचेचं तेज कमी होतं. आणि चेहरा निस्तेज दिसायला लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणत्या चुकांमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो.

जास्त मेकअप- जर तुम्ही रोज जास्त मेकअप करत असाल तर त्वचेचा ग्लो कमी होत असतो. जास्त पावडर आणि क्रिम्समधील वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केल्यामुळे त्वचेवरील ग्लो कमी होतो. त्वचेवर दाणे, पुळकुळ्या येत असतात, काळे डाग पडतात. म्हणून त्वचेवर कधीतरी मेकअप केल्यास काही फरक पडत नाही.पण जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर महागात पडू शकतं.

खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयी-आपण अनेकदा घाईघाईत व्यवस्थित आहार घेत नाही. सध्या बाहेरचं खाणं, जंक फूड याच्या सेवनाचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. नकळतपणे त्वचेवर पुळ्या येण्याचं प्रमाण वाढत जातं. खाण्यापिण्यातील हे लहान मोठे बदल त्वचा खराब होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.

बीझी लाईफस्टाईल-सध्याच्या काळात अभ्यास, मोबाईलचा वापर किंवा ऑफिसमुळे लोकांना स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. रात्री झोप सुद्धा पूर्ण होत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. याकडे वेळिच लक्ष दिलं नाही तर वयाआधी सुद्धा तुम्ही वयस्कर दिसू शकता.

मेकअप प्रोडक्टस- मेकअप प्रोडक्ट्सचा योग्य वापर न केल्यामुळे किंवा स्वस्त आणि केमिकलयुक्त क्रिमचा वापर अधिक केल्यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं.

कोरडी त्वचा- कोरड्या त्वचेकडे अनेक लोक लक्ष देत नाही. पण कोरड्या त्वचेवरचं सगळ्यात आधी सुरकुत्या यायला सुरूवात होते. म्हणून जर तुम्हाला तुमची त्वचा कोरडी वाटत असेल तर मॉईश्चराईजरचा वापर सगळ्यात आधी करायला हवा.

मेकअप न काढता झोपणं- अनेकदा फक्त कंटाळा आला म्हणून किंवा दुर्लक्ष केल्यामुळे महिला चेहरा न धुताच रात्री झोपतात. तुम्हाला कल्पनाही नसेल तर पण चेहरा खराब होण्यासाठी ही गोष्ट सगळ्यात जास्त कारणीभूत ठरत असते.