मेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 01:32 PM 2018-10-14T13:32:51+5:30 2018-10-14T13:38:44+5:30
सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. परंतु मेकअप न करताही सुंदर दिसणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे.
बाजारामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर करून इंस्टंट ग्लो मिळवणं किंवा एखाद्या समारंभासाठी तयार होणं सहज शक्य होतं. परंतु त्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले केमिकल्स स्किनसाठी हानिकारक ठरतात.
तुमच्या डेली रूटीनमध्ये थोडेसे बदल करून तुम्हालाही मेकअपशिवाय सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवणं सहज शक्य आहे.
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिणं आरोग्यासोबतच स्किनसाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर, स्किनही काही दिवसांतच चमकदार होम्यास मदत होते.
सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध एकत्र करून प्यायल्याने पूर्ण दिवस फ्रेश राहण्यास मदत होते.
घराबाहेर जाताना चेहऱ्यावर आणि स्किनवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. कारण त्यामुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून स्किनचं रक्षण होण्यास मदत होते.