पांढरे झालेले दाढीचे केस नॅचरली काळे कसे कराल? उपाय एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:55 PM2024-10-07T13:55:57+5:302024-10-07T14:23:41+5:30

White Beard : दाढीचे केस कसे काळे करावे? असा त्यांना प्रश्न पडतो. यावर आज आम्ही तुम्हाला काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.

White Beard : वाढत्या वयात डोक्यावरचे आणि दाढीचे केस पांढरे होणं सामान्य आहे. मात्र, काही चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी किंवा चुकीची लाइफस्टाईल यामुळे आजकाल कमी वयातच डोक्याच्या केसांसोबतच दाढीचे देखील केस पांढरे होत असल्याने लोक हैराण आहेत. जास्तीत जास्त लोक डोक्याच्या केसांना डाय लावून ते काळे करतात. पण दाढीचे केस कसे काळे करावे? असा त्यांना प्रश्न पडतो. यावर आज आम्ही तुम्हाला काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.

केस पांढरे होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे जसजसं वय वाढतं तसतसं शरीरातील मेलेनिन कमी होतं. यात कारणाने मिशा आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो. त्यासोबतच तणाव, चुकीचं खाणं-पिणं, आजारी असणे आणि वृद्धापकाळ यानेही केस पांढरे होतात.

१) केस नॅचरल पद्धतीने काळे करण्यासाठी रोज पदीन्याचा चहा सेवन करा. या उपायाचा परिणाम दिसायला वेळ लागेल. पण याचा फायदा नक्कीच होतो.

२) रोज एक ग्लास पाण्यात कढीपत्त्याची काही पाने टाका. हे पाणी सकाळी उकडून थंड करून प्यावे. याने तुमच्या दाढीचे केस काळे होण्यास मदत मिळेल.

३) गायीचं तूपही दाढीचे केस काळे ठेवण्यात मदत करतं. गायीच्या तूपाने रोज दाढीच्या केसांची मालिश केल्यास केसांचा काळा रंग कायम राहतो.

४) अर्धा कप पाण्यात दोन चमचे साखर घाला. यात अर्धा चमचा लिंबूचा रस मिश्रित करुन हे मिश्रण दाढीच्या केसांना लावा. याने केस काळे राहतील.

५) अर्धा वाटी पपई बारीक करून त्यात चिमुटभर हळद आणि एक चमचा कोरफडीच्या रस मिश्रित करा. हे मिश्रण दाढीच्या केसांना लावल्यास केसांचा रंग काळा होईल.

६)) कढीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून गरम करा. हे तेल रोज दाढी आणि मिशांच्या केसांवर लावल्यास केस काळे राहतील.

७) दोन चमचे कांद्याच्या रसात पदीन्याची पाने मिश्रित करून दाढी आणि मिशांच्या केसांवर लावा. यानेही केस काळे राहण्यास मदत होईल.

८) आवळ्याचं पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन उकळून घ्या. हे तेल थंड करून रोज दाढीच्या केसांची मालिश करा. यानेही पांढरे केस दूर होतील.