How to use highlighter for glowing skin
ग्लोईंग आणि आकर्षक त्वचेसाठी हायलायटरचा 'असा' करा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:57 PM2020-02-22T15:57:09+5:302020-02-22T16:18:36+5:30Join usJoin usNext अनेक महिलांना मेकअप करायला खूप आवडत असतं. ग्लोईंग स्किन आणि शार्प लुकसाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात. अनेकजण पार्लरला जाण्याचा कंटाळा करतात आणि घरी मेकअपचं समान आणून ठेवतात. पण त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे हवा तसा लूक येत नाही. आज आम्ही तुम्हाला मेकअपमध्ये महत्वाचं आणि त्वचेला ग्लो देणारं हायलाईट कसं युज करायचं हे सांगणार आहोत. एका हायलाईटरला अनेकप्रकारे युज केलं जाऊ शकतं. आपल्या स्किन टोननुसार याची निवड करावी. हायलायटरचा वापर त्वचा आणि गाल चमकदार दिसण्यासाठी केला जातो. याचा वापर नाक, गळा, ओठ आणि गालांवर केला जातो. ज्यामुळे मेकअपचं फिनिशिंग येत असतं. हायलायटरचा वापर केल्यामुळे चेहरा, नाक, आणि गाल चांगले आणि उठावदार दिसून येतात. ब्रश आणि स्पॉन्जचा वापर करून तुम्ही हायलायटर लावू शकता. हायलाटर दोन प्रकारचे असतात. क्रिम बेसड् आणि दुसरं पावडर बेस्ट असतात. जर तुम्हाला तुमची त्वचा ऑयली वाटत असेल तर पावडरबेस्ड हायलाईटरचा वापर करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रिम बेसड्चा वापर करा. हायलायटर लावणे ही एक कला आहे. ज्यात हायलाईटर लावण्याच्या पद्धतीत कोणताही शॉर्टकट नाही. त्वचेच्या ज्या भागांवर तुम्हाला ग्लो हवा असेल त्या भांगावर तुम्ही हे अप्लाय करू शकता. चीकबोन्स, नाक, गळा आणि आयब्रो-बोनवर तुम्ही हे लावू शकता. (image credit-pinterest) हायलायटरचा वापर संपूर्ण मेकअप झाल्यानंतर करा. कंसीलर आणि फाऊडेशनचा वापर करून झाल्यानंतर तुम्ही हायलायटरचा वापर करू शकता. (image credit-pinterest) हायलाईटचा वापर करताना लक्ष असू द्या की जास्त प्रमाणात करू नका. कारण त्यामुळे तुमचा लूक खराब होऊ शकतो. त्यामुळे परफेक्ट लुकसाठी व्यवस्थित हायलायटरचा वापर करा. हायलाईटर नेहमी स्किन टोननुसार असावं. कारण चुकीचं हायलाईटर वापरल्यामुळे अतिमेकअप केल्यासारखा चेहरा दिसतो. फेअर असलेल्या लोकांनी पर्ली शेडचा वापर करायला हवा. पीच आणि गोल्ड हायलायटर सुद्धा वापरू शकता. (image credit-stylecaze)टॅग्स :ब्यूटी टिप्सBeauty Tips