उन्हाळ्यात तुमच्या हॅन्डबॅगमध्ये 'या' गोष्टी असणं गरजेचं, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:27 IST2019-05-28T13:19:58+5:302019-05-28T13:27:05+5:30

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे घरातून बाहेर निघताना हॅन्डबॅगमध्ये काही गोष्टी असणं गरजेचं आहे. या गोष्टींविषयी जाणून घेऊया.
सनस्क्रीन
उन्हाळ्यात तापमान अधिक असते. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे बॅगमध्ये सनस्क्रीन कायम ठेवा. उन्हात जाण्याआधी 15 मिनिटं ती त्वचेला लावा जेणेकरून त्वचेचं रक्षण होईल.
वेट वाइप्स
उन्हाळ्यात शरिराला खूप घाम येतो. चेहरा तेलकट होतो. अशावेळी वेट वाइप्सच्या मदतीने चेहरा पुसता येतो. तसेच चेहऱ्याला इंस्टंट फ्रेश लूक मिळतो.
गुलाब जल
स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जल भरून ठेवा. उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेशनची गरज असते. अशावेळी त्वचेवर थोडसं गुलाब जल लावा.
डिओड्रेंट
तापमानात वाढ झाल्याने सातत्याने घाम येतो. या घामाचा वास ही येतो. त्यामुळे उन्हाळ्यात डिओड्रेंटचा वापर करा.
सनग्लासेस
उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना आवर्जून सनग्लासेसचा वापर करा. जेणेकरून उन्हाचा डोळ्यांना त्रास होणार नाही.
छत्री
सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा.
पाण्याची बॉटल
उन्हाळ्यात जास्त तहान लागते तसेच शरिराला पाण्याची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे बॅगेत पाण्याची बॉटल नेहमी ठेवा.