Natural home remedies to stop hair whitening
कमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय?; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:06 PM2019-07-21T13:06:21+5:302019-07-21T13:15:44+5:30Join usJoin usNext कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा अनेकजणांना सामना करावा लागतो. तुम्हीही या समस्येने हैराण आहात का? अशातच अनेक लोक केस काळे करण्यासाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट करून घेतात किंवा बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया घरात सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा वापर करून हेअर मास्क तयार करण्याच्या पद्धती...कांदा कांद्याचा रस किंवा तेल केसांच्या वाढिसाठी आणि मजबुतीसाठी फायदेशीर ठरतं. तसेच केस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठीही कांदा मदत करतो. तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्येने हैराण असाल तर कांद्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. कांद्याचा रस किंवा तेल केसांच्या मुळांना लावून मसाज करा. अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतप माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवेल. आवळा असं म्हटलं जातं की, केसांसाठी आवळा गुणकारी ठरतो. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. केसांच्या मजबुतीसोबतच केस काळे करण्यासाठीही आवळा अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामुळेच अनेक शॅम्पू आणि तेल तयार करण्यासाठीही याचा वापर करण्यात येतो. आवळ्याची पावडर ब्रशच्या मदतीने केसांना लावू शकता. साधारणतः अर्धा तास ठेवून केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. काळा चहा एक कप पाण्यामध्ये दोन चमचे काळी चहापावडर उकळत ठेवा. थंड झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. हे पाणी केसांच्या मुळांना आणि केसांना लावा. एका तासाने केस स्वच्छ धुवून टाका. चहा पावडरमध्ये असलेल्या अॅन्टीऑक्सिडंट प्रॉपर्टिज पांढऱ्या केसांची वाढ रोखण्यासोबतच आधीपासूनच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मदत होते. (Image credit : lifealth.com)कढिपत्ता कढिपत्त्याची पानं घेऊन ती वाटून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये खोबऱ्याचं तेल एकत्र करून केसांना लावा. कढिपत्त्यामध्ये असलेलं मेलनिन पिग्मेंट हेअर फॉलिकल्स रिस्टोर करतं. जे केस पांढरे होण्यापासून रोखतं. बीट बीट शरीराच्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरतं. बीट किसून ते मास्क म्हणून केसांना लावल्याने फायदा होतो. केस गळण्यासोबतच पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठीही मदत होते. त्यासोबतच स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठीही मदत होते. तसेच यामुळे केस चमकदार होतात. टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सHair Care TipsBeauty Tips