स्किन हेल्दी ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्स कसं ठरतं फायदेशीर?; वापरा 'हे' नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:31 PM2019-09-02T13:31:01+5:302019-09-02T13:43:02+5:30

शरीर डिटॉक्स करण्याचा अर्थ म्हणजे, शरीरातून विषारी पदार्थां बाहेर काढण्याची प्रक्रिया. शरीर डिटॉक्स करताना फार काळजी घ्यावी लागते. कारण यामुळे अनेकदा जास्त भूक लागते आणि पचनक्रियाही फार संथ गतीने होते. आज आम्ही तुम्हाला काहीअशा पद्धती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही नॅचरल पद्धतीने शरीर डिटॉक्स करून अपचन, पोट फुगणं आणि तणाव यांसारख्या गोष्टींपासून दूर राहू शकतात.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक ठरतं. चुकीच्या पद्धतीचा आहार, धुम्रपान आणि मद्यसेवन शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढवतात. जे आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे अनिद्रा, तणाव, पिंपल्स, आळस, वजन वाढणं, डिप्रेशन, पचनक्रिया बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतात.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी तम्ही हळदीच्या ड्रिंक्सचं सेवन करू शकता. हे तयार करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये थोडशी हळद एकत्र करून उकळून घ्या. त्यानंतर पाणी थंड करून प्या.

मुबलक प्रमाणात कोथिंबीर आणि काकडीचं सेवन करणं तुमचं शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतं. याच्या सेवनाने शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही.

दररोज ग्रीन टीचं सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यासोबतच लिव्हरला अनेक आरोग्याच्या समस्यांसोबत लढण्याची ताकद मिळते.

डिटॉक्सिफिकेशनसाठी तुम्ही दिवसातून तीन वेळा लिंबाचा चहा करून प्या. लिंबामध्ये लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते.

डाळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. डाळींमध्ये झिंक मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत मिळते.

लसणामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टिबायोटिक गुणधर्म असतात. जे शरीराला नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.